Cyclone Remal : ‘रेमल’ चक्रीवादळ आज कुठे धडकणार? ‘या’ शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर

Cyclone Remal : ‘रेमल’ चक्रीवादळ आज कुठे धडकणार? ‘या’ शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर


Cyclone Remal Update : देशातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. त्यात बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. रेमल चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगालच्या किनारपट्टीत दिसून येणार आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने खबरदारीचे उपाय केले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्रीवादळ आज बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. चक्रीवादळ ताशी 110-120 किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात 1.5 मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाण्यास मज्जाव केलाय. त्याशिवाय रेमलच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाची शक्यता आहे. (Cyclone Remal Update hit west bengal today imd ndrf on alert flights cancelled railway service disruption)

आज रात्री उशिरा हे वादळ किनारपट्टीवर धडकणार असून खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ आज दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद असणार आहे.  केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे नुकसान झालंय. ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. तर आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये 27 आणि 28 मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा :  2024 मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल? INDIA च्या बैठकीआधीच AAP ची मोठी मागणी

दुसरीकडे चक्रीवादळामुळे आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू आणि कंटेनर हाताळणी व्यवस्था 12 तासांसाठी बंद असणार आहे. विभागाने कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. 

 



Source link