‘ही बेरोजगारीची महामारी…’ नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले…

‘ही बेरोजगारीची महामारी…’ नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले…


Rahul Gandhi on Gujrat viral video : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची वणवण सर्वांनी पाहिली असेल. पण, नोकरीसाठीची चेंगराचेंगरीसम परिस्थिती पाहिलीय का? देशभरात मागील काही तासांपासून एका व्हिडीओची प्रचंड चर्चा असून, एका व्हिडीओनं अनेकांचीच चिंता वाढवली आहे. त्याहीपेक्षा देशातील बेरोजगारीचा मुद्दा या व्हिडीओमुळं पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर येताना दिसत आहे. 

राहुत गांधी यांनी खस्ता खाणाऱ्या भारताबद्दल व्यक्त केली खंत 

गुजरातच्या भरूचमधील एका नोकरीसाठीच्या मुलाखतस्थळावरील व्हिडीओ सध्या चिंतेचा विषय ठरत असून, राजकीय वर्तुळापासून सामान्यांपर्यंत याच व्हिडीओची चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही विदारक परिस्थिती पाहून सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सबंध भाजपच्या फळीला खडे बोल सुनावले आहेत. 

एका खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्साठी शेकडोंच्या संख्येनं इच्छुकांनी मुलाखतस्थळी गर्दी केली. ही गर्दी इतकी वाढली की, तिथं असणारी संरक्षणक जाळीही तुटली. चेंगराचेंगरीसम परिस्थिती निर्माण झाली आणि हा संपूर्ण सावळा गोंधळ पाहून देशातील परिस्थिती नेमकी किती गंभीर वळणावर पोहोचली आहे, या गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं. 

हेही वाचा :  Success Story: ना IIT, ना IIM...तरीही भारतीय तरुणीला Amazon कडून तब्बल 1 कोटींचं पॅकेज

 

बेरोजगारीची महामारी… 

‘बेरोजगारीचा हा आजार भारतात सध्या महामारीचं रूप घेताना दिसत असून, भाजपशासित राज्य या आजारपणातं केंद्र झाली आहेत. एका सामान्य नोकरीसाठी रांगेत धक्के, खस्ता खाणारं भारताचं भविष्य पाहता हेच नरेंद्र मोदी यांच्या अमृतकाळातील वास्तव आहे’, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

Rahul gandhi raised concern stampede like situation in gujarat during job interview

 

भाजप आहे तोपर्यंत काहीही अपेक्षा ठेवू नका… 

भरुचच्या या व्हिडीओनंतर सपा अध्यक्ष अखिलेश कुमार यादव यांनीसुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि इथं त्यांनी खोट्या विकासाचा चेहरा समोर आल्याच्या आशयानं ट्विट केलं. ‘हे आहे खोट्या विकासाच्या गुजरात मॉडेलमागचं सत्य… दहा- वीस हजारांसाठी काही रिक्त जागांसाठी ही गर्दी… भाजपनं देशभरातील तरुणाईला बेरोजगारीच्या गर्त छायेत लोटलं आहे. ही तिच तरुणाई आहे, जी भाजपला सत्तेतून हटवत त्यांच्या भविष्याचा मार्ग निश्चित करणार आहे. कारण, भाजप असेपर्यंत तर काही आशा, अपेक्षाच नाही…. ‘

हेही वाचा :  VIRAL VIDEO : म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी सिंह थेट झाडावर चढला, जंगलाचा राजा घाबरला का? | viral video lion climbs tree to save his life from buffalo herd prp 93

 



Source link