पहिल्याच भेटीत शाहीदला आवडली मीरा राजपूत, १३ वर्षांनी लहान असूनही केले अरेंज मॅरेज

पहिल्याच भेटीत शाहीदला आवडली मीरा राजपूत, १३ वर्षांनी लहान असूनही केले अरेंज मॅरेज


शाहीद कपूर बॉलीवूडमधील नावाजलेला अभिनेता आहे. करिना कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर शाहीदचे नाव अनेक अभिनेत्रींसह जोडण्यात आले. पण मीरा राजपूतसह शाहीदने अरेंज मॅरेज करून सर्वच चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. शाहीद ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. तर २०१५ मध्ये त्याने दिल्लीतील मीरा राजपूतशी लग्नगाठ बांधली. कशी सुरू झाली यांची प्रेमकहाणी नक्की जाणून घ्या. अरेंज मॅरेज प्रेमामध्ये नक्की कसे बदलले आणि शाहीदला मीरा कशी आवडू लागली आणि आपल्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीला शाहीदने का होकार दिला याची लहानशी अरेंज कम लव्ह स्टोरी. (फोटो सौजन्य – @mira.kapoor Instagram)

​पहिल्याच भेटीत ७ तास गप्पा​

​पहिल्याच भेटीत ७ तास गप्पा​

शाहीदचे वडील पंकज कपूर यांच्या मित्राच्या मुलीला शाहीद पहिल्यांदा भेटायला गेला आणि त्याला ती आवडली. मीरा राजपूत त्यावेळी केवळ २० वर्षांची होती. ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यान मीराच्या घरी शाहीद तिला भेटायला गेला आणि गप्पा मारता मारता ७ तास कधी उलटले दोघांनाही कळले नाही. मीराला शाहीदने कधीच डेट केले नाही. २-३ वेळा भेटून दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

हेही वाचा :  कियारा-सिद्धार्थच्या लग्नात चर्चा शाहीद-मीराच्या फॅशनची, रॉयल लुकमध्ये मीराने वेधले लक्ष

​१३ वर्षांनी लहान मुलीशी लग्न​

​१३ वर्षांनी लहान मुलीशी लग्न​

शाहीद आणि मीराचे अरेंज मॅरेज आहे. पहिल्यांदा जेव्हा शाहीद मीराला भेटायला गेला तेव्हा तिच्याशी बोलताना ती त्याला आवडली होती. मात्र त्यानेच एका मुलाखतीत खुलासा केला होती की स्वतःलाच त्याने प्रश्न विचारला होता की, १३ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसह लग्न करण्याचा विचार योग्य आहे की नाही आणि मुळात ती मुलगी आपल्याला होकार तरी का देईल? मात्र एकमेकांशी बोलल्यानंतर दोघांनीही लग्नाला होकार दिला होता.

(वाचा – चेन्नई सुपर किंग्जच्या शिवम दुबेची फिल्मी लव्ह स्टोरी, समाजाची बंधने झुगारून केले होते अंजुम खानशी लग्न)

​लग्नानंतरचे प्रेम​

​लग्नानंतरचे प्रेम​

प्रेम करून लग्न की लग्नानंतर प्रेम हा प्रश्न जगभरात असला तरीही प्रेम महत्त्वाचे. शाहीदचेही तसंच झालं. लग्नानंतर त्याला मीरा अधिक आवडू लागली. एका मुलाखतीमध्ये शाहीद म्हणाला की, मीराने माझे कुटुंब पूर्ण केले आहे. कुटुंबाचे प्रेम मला कधी मिळाले नव्हते पण मीराच्या येण्याने सर्व काही बदलले. लग्नानंतर शाहीद अधिकच मीराच्या प्रेमात आकंठ बुडत गेला. केवळ ३-४ भेटीनंतरच लगेच त्यांनी लहानशा कार्यक्रमात लग्न केले होते.

हेही वाचा :  शाहिदच्या पत्नीनं ईशान खट्टरच्या लगावली कानशिलात

(वाचा – पहिल्या भेटीत न आवडलेल्या राजकुमार रावबरोबरच केले पत्रलेखाने लग्न, अशी घडली लव्ह-स्टोरी)

​मीराची प्रशंसा करताना थकत नाही शाहीद​

​मीराची प्रशंसा करताना थकत नाही शाहीद​

लहान वयात दोन मुलांची आई आणि तरीही उत्तम जाण आणि घर सांभाळणे आणि त्याशिवाय स्वतःला फिट ठेवणे हे मीरा उत्तम करते असं शाहीदचं म्हणणं आहे. दोघेही नेहमी एकत्र दिसतात. बॉलीवूडमधील परफेक्ट जोडीपैकी ही एक जोडी आहे.

(वाचा – Ex BF वरूणने दिलेल्या दागिन्यांचा वाद, दिव्या अग्रवालने भडकून दिले उत्तर, नात्यातून बाहेर पडल्यावर काय लक्षात ठेवाल)

​शाहीदला कुटुंबात रमणं अधिक आवडतं​

​शाहीदला कुटुंबात रमणं अधिक आवडतं​

लग्न आणि दोन मुलं यामध्ये शाहीद रममाण झालेला पाहायला मिळालं. फार क्वचित पार्टीमध्ये हजेरी लावणं आणि कायम कुटुंबाला वेळ देताना शाहीदला पाहिलं गेलं आहे. तर संसारात मीरा शाहीदला उत्तम साथ देते आहे. शाहीदसह व्यावसायिक रँम्प वॉक असो अथवा एखाद्या पार्टीला जाणं असो मीराने नेहमीच शाहीदला साथ दिली आहे. दोघांनीही व्यावसायिक आणि खासगी आयुष्य संतुलित ठेवलं आहे.

​सुखी संसाराचे रहस्य​

​सुखी संसाराचे रहस्य​

Happy Marriage Life Secret: शाहीद अत्यंत माफक चित्रपटातून काम करतो आणि त्यानंतर सर्व वेळ तो आपल्या कुटुंबाला देतो. हेच दोघांच्या सुखी संसाराचे रहस्य आहे. तसंच एकमेकांवर जास्त राग रूसवा न धरता कायम एकमेकांना समजून घेणं आणि आनंदी राहणं हा बेसिक मूलमंत्र दोघांच्या नात्यातील प्रेम अधिक घट्ट करताना दिसून येत आहे.

हेही वाचा :  शाहिदचं घर कार्तिक आर्यनने घेतलं भाड्याने

प्रेम आणि सामंजस्य असेल तर नातं नेहमीच टिकतं मग त्यासाठी प्रेमविवाहच असायला हवा असं काही नाही. शाहीद आणि मीराच्या नात्यामधून हेच सिद्ध होते.

Source link