आंघोळीच्या पाण्यात मिसळा हा घरगुती पदार्थ, मिळेल तुकतुकीत त्वचा आणि होईल मॉईस्चराईज

आंघोळीच्या पाण्यात मिसळा हा घरगुती पदार्थ, मिळेल तुकतुकीत त्वचा आणि होईल मॉईस्चराईज


त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायांपासून ते खिशाला न परवडणाऱ्या खर्चिक उपायापर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. विशेषतः महिला त्वचेसाठी वेगवेगळे क्रिम्स वापरतात. त्याशिवाय बेसन, उटणे, हळदीचा वापर यासारखे घरगुती उपायदेखील करतात. थंडीच्या दिवसात तर त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण त्वचा कोरडी पडत असल्यामुळे मॉईस्चराईज करणे तर महत्त्वाचेच आहे. त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठीही वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर केला जातो. पण सर्वात उत्तम उपाय ठरतो तो म्हणजे तुपाचा वापर. तूप हे त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी उत्तम असून याचा खूप फायदाही होतो. तुपाचे त्वचेसाठी नक्की काय फायदे होतात जाणून घ्या.

रक्ताभिसरण होते ठीक

गरम पाण्यात तुम्ही जर तूप मिसळले आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर तुमचे रक्ताभिसरण चांगले राहाते. ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहिल्याने त्याचा परिणाम तुमची त्वचा अधिक सुंदर आणि तजेलदार होण्यास होते. त्वचेचा तुकतुकीतपणा हा तुमच्या रक्ताभिसरणावरही अवलंबून असते. असं केल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराचे तापमान संतुलित राहण्यासही मदत मिळते. तसंच अन्य आजारांपासून दूर राहण्यासही मदत मिळते.

हेही वाचा :  Planet parade : आज संध्याकाळी निरभ्र आकाशात पाहायला मिळणार अद्वितीय दृश्य, ग्रह रांगेत येणार आणि....

कोरडी त्वचा करते मॉईस्चराईज

थंडीच्या दिवसात त्वचा अधिक कोरडी पडते. त्यामुळे अनेकांना जास्त समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात तेल मिसळणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा अधिक काळ मॉईस्चराईज राहाते आणि कोरडेपणापासून तुम्हाला सुटका मिळते.

डोकेदुखीपासून होते सुटका

तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यात तूप मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही खा. डोकेदुखीपासून लवकर सुटका मिळते. हा उपाय तुम्ही वरचेवर वापरू शकता. जेणेकरून तुमचे डोके दुखणे बंद होईल.

खाजेपासूनही मिळते विश्रांती

काही जणांना घाम आल्यानंतर अंगाला खूपच खाज येते. खाजेमुळेही त्वचा कोरडी पडते. अशा परिस्थितीत कोमट पाण्यात तूप मिक्स करा आणि आंघोळ करावी. त्वचा कोरडी राहात नाही आणि त्याशिवाय अंगाला येणारी खाज निघून जाण्यासही मदत मिळते. तसंच आंघोळीच्या पाण्यात तूप घालून आंघोळ केल्याने तुम्ही अधिक ताजेतवाने दिसता आणि त्वचा तुकतुकीत राहाते.

ओठांना होतो फायदा

आंघोळीच्या पाण्यात तूप घालून ओठांना लावल्याने ओठ फाटण्याची समस्या कमी होते. हे तूप तुम्ही नियमितपणे ओठांना रात्रभर लाऊनही झोपू शकता. तसंच सकाळी आंघोळ करतानाही तुपाचा वापर करू शकता. यामुळे १२ महिने तुम्हाला ओठ फुटण्याचा त्रास असेल तर तो लवकरच संपेल. तुपाचा अधिक फायदा मिळेल.

हेही वाचा :  'या' देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल

तूप हा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. केवळ खाण्यातूनच नाही तर आंघोळीच्या पाण्यातूनही तूप वापरल्यास, त्वचेला अधिक फायदा मिळतो. तुम्हीही याचा वापर करून पाहा.

(फोटो क्रेडिटः Canva)

Source link