अमेरिकेत PNG ज्वेलर्समध्ये दरोडा; 20 जण 2 मिनिटात दागिने लुटून पसार; मध्यरात्री पाठलाग करुन 5 जणांना अटक

अमेरिकेत PNG ज्वेलर्समध्ये दरोडा; 20 जण 2 मिनिटात दागिने लुटून पसार; मध्यरात्री पाठलाग करुन 5 जणांना अटक


अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर (PNG Jewelers) 12 जूनला दरोडा टाकण्यात आला. तब्बल 20 दरोडेखोरांनी मध्यरात्री दुकानात घुसून दागिने लुटले होते. लुटीनंतर दरोडेखोर अनेक कारमधून पसार झाले होते. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोर पीनएजी ज्वेलर्समध्ये घुसले होते. यादम्यान त्यांनी काचा फोडण्यासाठी हातोडा आणि इतर गोष्टींचा वापर केला. लुटीनंतर दरोडेखोर पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाळलाग केला आणि 5 जणांना अटक केली. मागील 6 आठवड्यात बे परिसरात दरोडा टाकण्यात आलेलं हे तिसरं भारतीय दुकान आहे. 

Sunnyvale सार्वजनिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांना रात्री 1.30 वाजता फोन आल्यानंतर तात्काळ त्यांना उत्तर देण्यात आलं होतं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा दरोडेखोऱांनी आधीच अनेक गाड्यांमधून पळ काढला होता. दरोड्यादरम्यान कोणीही जखमी झालं नव्हतं. 

पोलिस अधिकाऱ्यांनी दोन वाहनांचा हायवे 101 वर सॅन फ्रान्सिस्को दिशेने पाठलाग केला. दोन्ही कार दिसायच्या बंद झाल्यानंतर पाठलाग थांबवण्यात आला होता. पण एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी रेडवुड सिटीजवळ एका कारचा माग काढला. यानंतर पाच दरोडेखोर कार तिथेच सोडून पायी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सॅन कार्लोस येथे त्यांना पकडण्यात आलं आणि ताब्यात घेण्यात आलं.

हेही वाचा :  Crime News : गुगल अर्थच्या मदतीने पठ्ठ्यानं शोधून काढली चोरीला गेलेली कार, पोलिसांच्या डोक्याच्या भुगा!

पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत अटक करण्यात आलेल्या पाचही दरोडेखोरांची ओळख पटवली आहे. टोंगा लाटू, तावके एसाफे, ओफा अहोमाना, किलिफी लीएटोआ आणि अफुहिया लावकेयाहो अशी त्यांची नावंही आहेत. या पाचही जणांवर सशस्त्र दरोडा आणि वाहन चोरीसह अनेक गुन्हे दाखल करत जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 

या घटनेनंतर अमेरिकतील भारतीय ज्वेलर्सना टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण याआधी नितीन ज्वेलर्स (4 मे) आणि नेवार्कमधील भिंडी ज्वेलर्स (29 मे) येथेही दरोडा टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे तिन्ही दरोड्यांमधील मोडस ऑपरेंडी सारखीच आहे. दरोडेखोरांनी डिस्प्ले केसेस हातोड्याने तोडण्यापासून ते कारमधून पळण्यापर्यंत सर्व सारखंच आहे. 

“सध्या, आमचे अधिकारी या तिन्ही दरोड्यांचा एकमेकाशी काही संबंध आहे का याची पाहणी करत आहेत,” अशी माहिती सार्वजनिक सुरक्षा विभागाचे सार्वजनिक माहिती अधिकारी कॅप्टन डझान ले यांनी दिली आहे. तसं असल्यास भविष्यात प्रसिद्धीपत्रकाद्वारे ते जाहीर करण्यात येईल असं ते म्हणाले आहेत. 



Source link