अंडर 19 विश्वचषकाचा स्टार राजवर्धन हंगरगेकरवर वय लपवल्याचा आरोप

अंडर 19 विश्वचषकाचा स्टार राजवर्धन हंगरगेकरवर वय लपवल्याचा आरोप


Rajvardhan Hungargekar  : नुकत्यात झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उस्मानाबाद येथील राजवर्धन हंगरगेकर याने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळेच त्याला आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्जने 30 कोटी बेस प्राईज असताना तब्बल दीड कोटी रूपये मोजून आपल्या संघात घेतले. परंतु, राजवर्धनबाबत आता नवा वाद निर्माण झाला आहे. राजवर्धन याने अनधिकृतपणे जन्मतारखेत बदल करून आयसीसीच्या 19 वर्षाखालील विश्चचषक स्पर्धेत खेळल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 

राज्याचे क्रीडाआयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला याबाबत पत्र लिहिले आहे. बकोरिया यांनी लिहिलेल्या पत्रातून राजवर्धन याने वयचोरी कशी केली? याबाबतची माहिती मागवली आहे. 

बकोरिया यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी राजवर्धन याच्या जन्मतारखेची पडताळणी केली. त्यानुसार तो उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. पहिली ते सातवीपर्यंत पब्लिक स्कूलमधील नोंदीमध्ये त्याची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 अशी होती. परंतु, आठवीत प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी अनधिकृतपणे जन्मतारखीख बदलून ती 10 नोव्हेंबर 2002 केली. त्यामुळे 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्फर्धेवेळी त्याचे वय 21 वर्षे होते.

हेही वाचा :  'नो बॉल' ची हॅट्रिक करणारा पहिला भारतीय, दुसऱ्या टी20 मध्ये अर्शदीपच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

राजवर्धन याने अंडर-19 मध्ये वेधलं होतं क्रीडा प्रेमींचं लक्ष  
 अंडर-19 वर्ल्डकपमधील राजवर्धन हंगरगेकरच्या कामगिरीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानं केवळ गोलंदाजीनंच नव्हे तर, फलंदाजीनंही प्रेक्षकांना आकर्षित केल होतं. 

अंडर-19 वर्ल्डकपमध्ये आयर्लँड विरुद्ध 45 व्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या राजवर्धन यानं तुफानी खेळी केली होती. त्यानं 17 चेंडूंमध्ये नाबाद 39 धावा तडकवल्या. यात एक चौकार आणि पाच षटकार आहेत. त्यानं अखेरच्या षटकात सलग 3 षटकार ठोकून सर्वांच लक्ष वेधून घेतल होतं. राजवर्धनच्या फलंदाजीचा हा व्हिडीओ आयसीसीने ट्विट केला होता. परंतु, आता नव्या वादामुळे बीसीसीआय त्याच्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महत्वाच्या बातम्या

Source link