विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली भन्नाट उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर; चुकीची असूनही दिले 5 मार्क

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली भन्नाट उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर; चुकीची असूनही दिले 5 मार्क


परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना घामच सुटतो. परीक्षेत आपण अशी उत्तरं लिहिलं पाहिजेत, जेणेकरुन जास्तीत जास्त मार्क मिळावेत अशी प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते. पण काही विद्यार्थी परीक्षा फार गांभीर्याने घेत नाहीत. ते परीक्षेतही अशी उत्तरं लिहितात जे वाचून शिक्षकांना हसावं की रडावं हे कळत नाही. अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही उत्तरपत्रिका पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाही आहे. त्याने प्रश्नांची अशी काही उत्तरं लिहिली आहेत की, शिक्षिकेला ती चुकीची असतानाही 5 गुण दिले आहेत. 

इंस्टाग्रामला @n2154j या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्याकरणाच्या प्रश्नावर विद्यार्थ्याने वेगळा दृष्टीकोन मांडणारी उत्तरं लिहिली आहेत. यामध्ये पहिला प्रश्न होता की, मिश्रित व्यंजन म्हणजे काय? त्यावर त्याने उत्तर दिलं की, “मटर पनीर आणि सर्व मिश्र भाज्या मिश्रित पदार्थ आहेत”.

यामध्ये दुसरा प्रश्न होता की, भूतकाळ कशाला म्हणतात? त्यावर विद्यार्थ्याने उत्तर लिहिलं की, ‘जेव्हा भूत आपला काळ बननू येतो, तेव्हा त्याला भूतकाळ म्हणतात’. तिसरा प्रश्न होता की, बहुवचन कशाला म्हणतात?. यावरही त्याने असंच भन्नाट उत्तर देत लिहिलं की, ‘ससुरालचे वचन ऐकणाऱ्या सूनेला बहुवचन म्हणतात’.

तांत्रिकदृष्ट्या ही उत्तरं चुकीची असल्याने शिक्षिकेने त्यांना चूक म्हटलं आहे. पण यावेळी त्याचा हजरजबाबीपणा पाहून शिक्षिका स्वत:ला कौतुक करण्यापासून रोखू शकल्या नाहीत. यामुळे शिक्षिकेने त्याला 10 पैकी 5 गुण दिले आहेत. ‘तुझ्या हुशारीसाठी हे 5 मार्क दिले आहेत, बाळा’, असा शेरा शिक्षिकेने लिहिला आहे.

हेही वाचा :  Rupali Chakankar: छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत रुपाली चाकणकरांचे भरत गोगावलेंना खडे बोल!

दरम्यान या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच हास्यकल्लोळ सुरु आहे. अनेकांनी तर विद्यार्थ्याला त्याच्या या कॉमेडी उत्तरांसाठी पूर्ण मार्क द्या असं सांगितलं आहे. कमेंटमध्ये अनेकांनी हसतानाच्या इमोजी शेअर केल्या आहेत. 

दरम्यान एका युजरने ही उत्तरपत्रिका खरी आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विद्यार्थी आणि शिक्षकाचं अक्षर असल्याचं त्याने दाखवलं आहे. ‘विद्यार्थी आणि शिक्षिकेचं हस्ताक्षर सारखंच आहे. कॉपी करतानाही आपल्याला शहाणपणा वापरावा लागतो,’ अशी कमेंट त्याने केली आहे. ही उत्तरपत्रिका खोटी असल्याचा दावा त्याने केला आहे. 



Source link