Strike in Maharashtra : जुन्या पेन्शनसाठी 18 लाख कर्मचारी संपावर, सरकारी कार्यालये ओस

Strike in Maharashtra : जुन्या पेन्शनसाठी 18 लाख कर्मचारी संपावर, सरकारी कार्यालये ओस


Strike in Maharashtra : सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आक्रमक झाले आहेत. (Government Employees Strike) 18 लाख कर्मचारी हे आपल्या मागणीसाठी ठाम असून ते कामबंद संपात सहभागी झाले आहेत.  (Maharashtra Strike) जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हे सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. पण राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय. सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक काढत संपात सहभागी होणा-या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. (Maharashtra Strike News in Marathi)

चर्चा निष्फळ ठरल्याने संप

सरकार म्हणत आहे की, आम्ही सर्वांसाठी काम करत आहोत. पण कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेसाठी उदासीन आहेत. मुख्य सचिवांची बैठक आमच्या सोबत झाली आहे. पण निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच आहेत. त्यामुळे मुख्य सचिवांनी आम्हांला विधानभवनात बैठकीसाठी बोलावण्यात आलं होत. सरकार या मागणीसाठी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही, असा कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे. 

त्याचेवळी आम्ही त्यांना सांगितले की केवळ धोरण म्हणून मान्य करा, अभ्यास नंतर करा, पण तर तयार नव्हते, आमचा संप मागे घ्या अशी विनंती त्यांनी केली. सुकाणू समितीची चर्चा झाली आणि आम्ही ठरवले की उद्या पासून 18 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार सरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिकेत्तर कर्मचारी, परीक्षा सुरु आहे तिथे अडचण होणार आहे. आरोग्य कर्मचारी संपावर जाणार त्यामुळे अडचण होणार आहे. पण आम्ही उद्यापासून संपावर जाणार, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. त्याप्रणाणे आजपासून संप सुरु झाला आहे.

हेही वाचा :  नवाब मलिक मुंबईत डान्सबार आणि सेक्स रॅकेट चालवायचे; मोहित कंबोज यांचे गंभीर आरोप

दरम्यान, कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिल्यानंतर यापेक्षा उग्र आंदोलन करु, असे प्रत्युत्तर कर्मचाऱ्यांनी दिले आहे. रुग्णालय, शिक्षण, प्रशासकीय विभाग, ग्रामीण इथे परिणाम होईल, पण विधान सभेच्या कामकाजावर जास्त फरक पडेल वाटत नाही. जर कारवाई करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन कर्मचाऱ्यांनी संघनेने दिले आहे.

परिचारिकाही संपावर

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालयातील परिचारिका संपावर गेल्या आहेत. मेडीकलमधील 1100 परिचारीका संपावर आहे. जुन्या पेन्शननच्या मागणीसाठी आजपासून सर्व परिचारिकांचे कामबंद आंदोलन केले आहे.  परिचारिकांच्या संपामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 



Source link