तिसऱ्या टी20 मध्ये ऋषभ पंत स्वस्तात बाद, संजू सॅमसनचे फॅन भडकले, शेअर केले भन्नाट मीम्स

तिसऱ्या टी20 मध्ये ऋषभ पंत स्वस्तात बाद, संजू सॅमसनचे फॅन भडकले, शेअर केले भन्नाट मीम्स


India vs New Zealand 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पावसाने खोळंबा घातल्याने निकाल समोर येऊ शकला नाही. न्यूझीलंडच्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारत 9 ओव्हरमध्ये 75 रनच करु शकला पण डकवर्थ लुईस मेथडनुसार सामना बरोबरीत सुटला. पण असं असताना या सामन्यातही पुन्हा एकदा ऋषभ पंतने मैदानात उतरून सर्वांची निराशा केली. या दौऱ्यात पंतला सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती, पण त्याचा फायदा तो उचलू शकला नाही. मागील सामन्यात त्याने 13 चेंडूत 6 धावा केल्या होत्या, तर आजही 5 चेंडूत 11 धावाच करता आल्या. 

सामन्यात पुन्हा एकदा पंतने खराब कामगिरी केल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गेल्या सामन्यातही त्याच्या खराब कामगिरीबद्दल चाहत्यांनी त्याची खरडपट्टी काढली होती. याआधी, पंतला T20 विश्वचषकातही दोन संधी देण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये त्याने अवघ्या 9 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड दौऱ्यातही त्याची हीच कामगिरी दिसून येते. दरम्यान पंत सतत संधी गमावत असल्यामुळे त्याच्यावर क्रिकेटप्रेमी टीका करत आहेत. खासकरुन संजू सॅमसनचे चाहते मोठ्या प्रमाणात टीका करत असून संजूला संधी मिळत नसल्यामुळे त्यांची निराशा झळकत आहे. तर नेटकऱ्यांनी शेअर केलेले खास पोस्ट पाहूया…

Reels

हेही वाचा :  गुजरातकडे हार्दिक, राशिद आणि शुभमनसह आणखी एक हुकूमी एक्का,भारताला जिंकवून दिला होता विश्वचषक

हे देखील वाचा –

हेही वाचा :  IND vs SL, Mohali Test : कोहलीविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली



Source link