Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलसंदर्भात मोठी बातमी, ‘या’ शहरात पेट्रोल महाग!

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलसंदर्भात मोठी बातमी, ‘या’ शहरात पेट्रोल महाग!


Today Petrol Diesel Price: कच्चा तेलाच्या दरात चढ- उताराची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. दुसरीकडे, आज म्हणजेच 12 जानेवारी 2023 रोजी कच्चा तेलाच्या किमतीत अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी यूपी ते बिहारमधील काही शहरांमध्ये कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली. मात्र दिल्ली-मुंबई यासारख्या चार महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलच्या (mumbai petrol diesel rate) किमतीत स्थिर आहेत.

सरकारी तेल कंपनीच्या अहवालानुसार, गौतम बुद्ध नगर (Noida-Greater Noida) मध्ये आज पेट्रोल (petro price) 5 पैशांमी महाग होऊन 96.65 रुपये प्रति झाले. तर डिझेल 5 पैशांनी वाढून 89.82 रुपये प्रति लिटर झाले. गाजियाबादमध्ये पेट्रोल 32 पैसे महाग होऊन 96.58 रूपये लीटरवर तर डिझेल 30 पैशांनी वाढून 89.75 रूपये लीटर वर पोहचले आहे. लखनौमध्ये पेट्रोल 13 पैशांनी स्वस्त होऊन 96.44 रुपयांवर पोहोचले. तर डिझेल 12 पैशांनी घसरून 89.64 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. पाटणामध्ये पेट्रोल 21 पैशांनी वाढून 107.80 रुपये प्रति लिटर तर डिझेल 20 पैशांनी वाढून 94.56 रुपये प्रति लिटर झाले आहे. 

हेही वाचा :  Ajit Pawar Satara Press Conference: "आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते असू तर..."; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate)

– दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

वाचा: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा 

या शहरांमध्ये दर बदलले

– नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर 
–  गाजियाबाद पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर 
– पाटणामध्ये पेट्रोल 107.80 रुपये आणि डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर
– लखनऊमध्ये पेट्रोल 96.44 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रति लिटर  

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

हेही वाचा :  Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दर

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.



Source link