Maharastra Politics : ‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?’, कांद्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची आक्रमक टीका

Maharastra Politics : ‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?’, कांद्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची आक्रमक टीका


Onion Export Price News : दक्षिण भारतातील बेंगलोर रोझ कांद्यावर (Bangalore rose onion) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के शुल्क हटवल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. राज्यातील कांद्याचे निर्यात शुल्क मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता लासलगावमधील खासगी बाजार समितीतील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला, तसेच लिलाव देखील बंद पाडले. अशातच आता याच मुद्द्यावरून रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक झाले आहे. रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले Rohit Pawar ?

केंद्र सरकारने कर्नाटकात पिकवल्या जाणाऱ्या बंगळुरू रोझ व्हारायटीच्या कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे, याआधी गुजरातमध्ये पिकवल्या जाणाऱ्या कांद्यासाठी निर्यातबंदी पूर्णता उठवली होती, परंतु महाराष्ट्राचा कांद्यावरील निर्यातबंदी अद्यापही उठवलेली नाही. इतर राज्यात पिकवल्या जाणाऱ्या कांद्याच्या व्हरायटी निर्यातीसाठी मुक्त करायच्या आणि महाराष्ट्रात पिकणाऱ्या कांद्याच्या व्हरायटीवर निर्यातबंदी लावायची असं का? केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का? असा सवाल रोहित पवारांनी सरकारला विचारला आहे. 

कर्नाटक सरकारने पाठपुरावा करून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, पण आपल्या राज्य सरकारला मात्र काहीही घेणेदेणे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आपण सर्वांनी पाठपुरावा करून या केंद्र सरकारला जाता जाता तरी एखादा चांगला निर्णय घेण्याची विनंती करावी, अशी मागणी करत रोहित पवारांनी खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी कांद्याच्या मुद्दयावरून जोरदार घोषणाबाजी केली होती. बंगळुरू येथील ‘बेंगलोर रोज’ हा कांद्याला शून्य टक्के निर्यातमूल्य आकारून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेलंय का? असा प्रश्न देखील आता विचारला जातोय.

हेही वाचा :  Baba Bageshwar यांचा दिव्य दरबार यूपीत, थेट सीएम योगींची चिठ्ठी उघडली जाणार?



Source link