अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या; पोलिसांनी आरोपीला सोडून दिलं, म्हणाले ‘कदाचित त्याने…’

अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या; पोलिसांनी आरोपीला सोडून दिलं, म्हणाले ‘कदाचित त्याने…’


अमेरिकेतील इंडियाना राज्यात मंगळवारी एका 29 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. रस्ते प्रवासादरम्यान झालेल्या भांडणादरम्यान त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नवविवाहित गेविन दसौर आपल्या मेक्सिकन पत्नीसह घरी जात असताना इंडी शहरातील चौकात झालेल्या वादानंतर आरोपींनी त्याला गोळ्या घालून ठार केलं.

दसौर हा आग्रा येथील होता. त्याच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वी 29 जून रोजी त्याचे आणि विवियाना झामोरा यांचं लग्न झाले होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दसौर कारमधून उतरताना आणि पिकअप ट्रकच्या ड्रायव्हरशी भांडताना दिसत आहे. 

यानंतर तो ट्रकच्या दरवाजावर जोरात हात आपटतो. यावेळी त्याच्या हातात बंदूक असते. दरम्यान भांडण सुरु असतानाच कारमधील चालक बंदुकीने त्याच्यावर गोळ्या झाडतो, जी थेट त्याच्या डोक्याला लागते आणि खाली कोसळतो. एक गोळी त्याच्या टोपीला लागत असल्याचंही दिसत आहे. 

जखमी अवस्थेत गेविनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेविनच्या पत्नीने सांगितलं आहे की, तो रक्ताच्या थारोळ्या पडला असताना मी त्याला पकडलं होतं. मी रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबले होते. 

हेही वाचा :  देबिना बॅनर्जीने अनोख्या पद्धतीने दुसऱ्या मुलीचं नाव केलं शेअर, अर्थ कळताच अंतःकरणापासून जोडाल हात

पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या आरोपीने स्वसंरक्षणार्थ हे कृत्य केले असावं. “पुढील तपासानंतर आणि मॅरियन काउंटी अभियोजक कार्यालयाशी सल्लामसलत केल्यानंतर, त्या व्यक्तीला सोडण्यात आले,” अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली आहे. 



Source link