ICC World Cup, IND vs BAN : भारतीय महिलांसमोर बांग्लादेशचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

ICC World Cup, IND vs BAN : भारतीय महिलांसमोर बांग्लादेशचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?


IND vs BAN : आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांनी (Indian Women Cricket team) आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बांग्लादेशविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला (India vs Pakistan) मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी वेस्ट इंडीजला (India vs West Indies) मात दिली. पण चौथ्या सामन्यात इंग्लंडने आणि पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर निसटता विजय मिळवला आहे. त्यामुळे बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकून भारताचा पुढील मार्ग सुखकर होईल.  

कुठे खेळवला जाणार सामना?

भारत विरुद्ध बांग्लादेश महिला संघातील हा सामना न्यूझीलंडमधील हॅमिलटनच्या सेडन पार्क ठिकाणी खेळवला जाणार आहे.

कधी खेळवला जाणार सामना?

भारत आणि बांग्लादेश महिला संघातील हा सामना उद्या अर्थात 21 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

कसा पाहाल सामना?

हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.

हेही वाचा :  पोर्तुगालचा संघ पहिल्या विश्वचषक ट्रॉफीच्या शोधात; रोनाल्डोसह 'या' 26 खेळाडूंवर मोठी जबाबदारी

भारतीय संघ:

मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link