IAS Pooja Khedkar: ‘एखादी महिला जेव्हा…’, पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, ‘ही कसली चूक’

IAS Pooja Khedkar: ‘एखादी महिला जेव्हा…’, पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, ‘ही कसली चूक’


आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्यावर आपल्या अधिकाऱांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यंची  केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे. यादरम्यान त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी मात्र मुलीची बाजू घेतली आहे. दिलीप खेडकर यांनी मुलीवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने कोणतीही चूक केली नसताना विनाकारण छळ केला जात आहे असा दावा त्यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना केला आहे. 

पूजा खेडकर यांच्यार आपली मानसिक स्थिती योग्य नसल्याचं तसंच आपल्या अपंगत्वाबद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. तसंच वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळवलं असा प्रश्न विचारला जात आहे. आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावण्यामुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकर यांनी सेवेत दाखल होण्यापूर्वीच अनेक मागण्या केल्या होत्या. प्रशिक्षणार्थी असतानाच पूजा खेडकर यांनी कार, स्वीय्य सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केली होती. 

दिलीप खेडकर यांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना खेडकर यांनी त्यांच्या मुलीच्या अयोग्य मागण्या आणि प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुण्यात असताना केलेल्या अनुशासनाच्या वादावर भाष्य केलं आहे. बसण्यासाठी जागा मागणे ही चूक नाही, असं मत त्यांनी मांडलं आहे. 

हेही वाचा :  पाशवी बहुमताच्या जोरावर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडू शकतात; संजय राऊतांनी व्यक्त केली शक्यता

“माझ्या मुलीने काही चुकीचं केलेलं नाही. एखाद्या महिलेने बसण्यासाठी जागा मागणं यात चूक काय? हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. आपण सर्वांनी समिती काय निकाल देते याची वाट पाहायला हवी. मी एवढंच म्हणेन की कोणीतरी मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असं दिलीप खेडकर म्हणाले आहेत. पण यावेळी त्यांना कोण हा वाद निर्माण करत आहे असं विचारलं असता त्यांनी नाव घेण्यास नकार दिला. 

पूजा खेडकर यांच्या आईचा धमकावतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओत पूजा खेडकर पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं दिसत आहे. “जागा माझ्या नावावर आहे. मूळ मालक मी आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. मला आधी कोर्टाचा कागद आणून दाखवायचा,” असं मनोरमा खेडकर हातात पिस्तूल घेऊन वाद घालताना म्हणत आहेत. “मी कोर्टात येणार, काय व्हायचं ते होऊ दे,” असं मनोरमा म्हणताना दिसत आहेत.

व्हिडीओ शूट करणारा शेतकऱ्यांबरोबरची व्यक्ती, ‘मॅडम आपलं कायदेशीर सुरु आहे. तुम्ही आम्हाला का त्रास देताय?’ असं विचारतो. त्यावर मनोरमा, “तुम्ही मला कायद्याचं सांगू नका. कायद्याने मला सांगितलेलं नाही की तुम्ही करु नका म्हणून,” असं उत्तर देताना दिसतात. त्यानंतर बराच वेळ हा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :  Sleeping Tips : महिला पुरूषांपेक्षा जास्त का झोपतात? अभ्यासात मोठा खुलासा

पूजा खेडकर यांचा जास्त भाष्य करण्यास नकार

पूजा खेडकर यांना प्रसारमाध्यमांनी आईचा व्हिडीओ तसंच इतर आरोपांबद्दल विचारलं असता त्यांनी, माझ्याकडे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही सांगत जास्त भाष्य कऱणं टाळलं. माझं जे काही म्हणणं असेल ते मी समितीकडे मांडणार आहे. मी या विषयावर बोलू शकत नाही असं पूजा खेडकर यांनी सांगितलं आहे. 



Source link