दिल्लीत १६ मार्चपासून पर्यावरणपूरक वाहने

दिल्लीत १६ मार्चपासून पर्यावरणपूरक वाहने



दिल्लीत १६ मार्चपासून पर्यावरणपूरक वाहने

नागपूर : सीएनजीवरील वाहनानंतर आता ग्रीन हायड्रोजनवर चालणारी वाहने शहरात आणत आहोत. ग्रीन हायड्रोजनवरील जगात रेल्वे धावत असून काही देशात कारही धावत आहे. आता हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत १६ मार्चपासून चालणार आहे. नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

१२ ते १४ मार्चदरम्यान आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाची माहिती देताना रविवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रक्रिया प्रकल्प महापालिकेच्यावतीने शहरात राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. कचरा आणि पाण्यातून हे ग्रीन हायड्रोजन इंधन निर्माण केले जाईल. ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याचे विदर्भ हे केंद्र असणार आहे. अशी माहिती गडकरी यांनी या वेळी दिली.  विदर्भात ७५ टक्के पाणी आणि ८५ टक्के जंगल आहे, याची मागणी मोठी आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मँगनीज आहे. त्या ठिकाणी स्टील उद्योगांची मोठी क्षमता असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. बांगलादेश पहिल्या क्रमांकाचा रेडिमेड कॉटन गारमेंट आयात करणारा देश आहे. तेथे विदर्भाचा कापड जातो. विदर्भात उद्योगाची मोठी क्षमता आहे. मात्र आपल्याकडे एकमेकांत ताळमेळ नाही. पण सर्व उद्योग एकमेकांवर आधारित आहे. पर्यटनवाढीसाठी आता सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरली जाणार आहेत. त्यामुळे प्रदूषण आणि आवाज होणार नाही.

हेही वाचा :  'आज बाळासाहेब असते तर त्यांनी..', अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, 'नव्या मोगलांना..'

The post दिल्लीत १६ मार्चपासून पर्यावरणपूरक वाहने appeared first on Loksatta.

Source link