‘बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..’, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?

‘बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..’, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?


Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency: लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीतील गोविंद बागेत आज सकाळपासून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शरद पवारांना भेटण्यासाठी इथे लोकांची मोठी गर्दी होत आहे. याच भेटीदरम्यान शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचे तरुण समर्थकही शरद पवारांना भेटले. मात्र या भेटीची अधिक चर्चा होण्याचं कारण ठरलं आहे युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांकडे केलेली मागणी.

काय म्हणाले कार्यकर्ते?

युगेंद्र पवारांचे युवा कार्यकर्ते आज शरद पवारांना भेटले त्यांनी शरद पवारांकडे ‘बारामतीचा दादा बदलाचाय. तुम्ही युगेंद्र पवारांना ताकद द्या,’ अशी मागणी केली. ‘योगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष घालत आहेत. लोकांच्या समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा,’ अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. युगेंद्र पवारांनी विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. युगेंद्र पवारांना बारामतीमधूनच उमेदवारी देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत.

हेही वाचा :  वेगळी भूमिका अन् भविष्य... अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवारांच्या भेटीसाठी अगदी मोठ्या संख्येनं आलेले हे कार्यकर्ते पवार जिथे कार्यकर्त्यांना भेटतात त्या दालनामध्ये जमीनीवरच बसून आपलं म्हणणं शरद पवारांना सांगत होते. शरद पवारांनी या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हातवारे करत उमेदवारीची चर्चा करू नका असं सांगितलं. तसेच, यावर काय तो निर्णय लवकरच होईल असं सांगताना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्यास सांगितले.

नक्की पाहा हे फोटो >> ₹ 5700 कोटींचा मालक… सर्वात श्रीमंत MP केंद्रात मंत्री! मोदींनी सोपवली मोठी जबाबदारी; संपत्तीचा स्रोत..

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव असून त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. युगेंद्र पवार हे बारामतीमधील जनतेमध्ये अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. युगेंद्र पवार यांच्यातील संघटन कौशल्य अगदी लहान वयातच दिसून येतं. शरयू अॅग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून युगेंद्र पवार कार्यरत आहेत आहेत. तसेच बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार पदही युगेंद्र पवारांकडे आहे. याशिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदही युगेंद्र पवार भूषवतात. अजित पवारांचा गट पक्षातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यावर युगेंद्र पवार आजोबांच्या गटाच्या बाजूने उभे राहिल्याचं दिसून आलं. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावरुन आजोबांची बाजू मांडली आणि आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली. सुप्रिया सुळेंसाठी त्यांनी बारामतीमध्ये प्रचार केला.

हेही वाचा :  5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम

नक्की वाचा >> ‘हा भटकता आत्मा तुम्हाला…’; मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर

बारामतीत पवार विरुद्ध पवार

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघ अजित पवार गट आणि शरद पवार गटाने प्रतिष्ठेचा विषय केला होता. अजित पवार तर मतदारसंघामध्ये ठाण मांडून होते. अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर त्यांच्यासमोर बारामतीच्या विद्यमान खासदार तसेच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे लढत होता. नणंद-भावजयमधील या निवडणुकीकडे महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले होते. दोन्ही बाजूने आम्हीच जिंकू असा दावा केला जात होता. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 4 जून रोजी निकाल समोर आला.

नक्की वाचा >> ‘भाविकांच्या रक्ताचे ‘लाल’ गालिचे ‘मोदी-3’साठी..’, ‘मोदी कामचुकार’ म्हणत ठाकरे गटाचा चौघांवर निशाणा

शरद पवार गटाचा मोठा विजय

सुप्रिया सुळेंनी येथील लोकसभेची निवडणूक दीड लाखांहून अधिक मतांनी जिंकली. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून शरद पवार हेच बारामतीचे खरे पवार असल्याचं मतपेटीतून सिद्ध झाल्याच शरद पवार गटाकडून निकालानंतर सांगण्यात आलं. ‘बाप बाप असतो’ असं म्हणत शरद पवारांची लेक जिंकल्यानंतर अजित पवार गटाला डिवचण्यात आल्याचं चित्रही सोशल मीडियावर पाहायला मिळालं. आता विधानसभेलाही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं



Source link