बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती; चांगले पद, पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती; चांगले पद, पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज


BOM Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स अ‍ॅण्ड ट्रेझरी, आयटी, डिजिटल बॅंकिंग/सीएसएसओ/सीडीओ आणि इतर डिपार्टमेंटमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत.10 जुलैपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंटची 40 पदे, फॉरेक्स अ‍ॅण्ड ट्रेझरीची 38 पदे, आयटी/ डिजिटल बॅंकिंग/सीएसएसओ/सीडीओची एकूण 49 पदे आणि इतर डिपार्टमेंटमधील 68 पदे अशी मिळून एकूण 195 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.पुण्यातील हेड ऑफिसमध्ये ही भरती केली जाणार आहे. इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे फायनान्स,इकोनॉमिक्स, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असावा.50 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. 

फॉरेक्स अ‍ॅण्ड ट्रेझरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पोस्ट ग्रॅज्युएशन फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस,चार्टड अकाऊंटमध्ये स्पेशलायझेशन असणे आवश्यक आहे. आयटी, डिजिटल बॅंकिंग/सीएसएसओ/सीडीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बीटेक/बीई इन आयटी/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक अॅण्ड कम्युनिकेशन/एमसीए/एमएससी कॉम्प्युटर सायन्समध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

कुठे पाठवाल अर्ज?

सामान्य वर्ग/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1,180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांकडून 118 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये अर्जाच्या फॉर्मची पीडीएफ देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज जनरल मॅनेजर, बॅंक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम डिपार्टमेंट, हेड ऑफिस, लोकमंगल. 1501, शिवाजीनगर, पुणे-411005 येथे पाठवायचे आहेत.  उमेदवारांना 26 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.अधिकृत वेबसाइट  bankofmaharashtra.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आली आहे.



Source link