सर्वात उंच झरा सांगून चीनने जगाला बनवलं मुर्ख; सत्य समजल्यावर तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल

सर्वात उंच झरा सांगून चीनने जगाला बनवलं मुर्ख; सत्य समजल्यावर तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल


China Artificial Waterfall: भारताचे शेजारी राष्ट्र चीन हे सीमेवर नेहमी कुरघोडी करत असतं. दरम्यान भारतात आलेल्या चायनीज वस्तू किती काळ टिकतील? हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. तरीही चीन काहीना काही तयार करुन आपणच कसे वेगळे आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण चीनचा खोटारडेपणाही तितक्या लवकरच पुढे येतो. असाच काहीसा प्रकार समोर आलाय. आमच्याकडे आशियातील सर्वात उंच झरा आहे, असे चीन जगाला सांगत होता. पण त्याची सत्यता आता जगाच्या समोर आली आहे. चीनसाठी ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असून एका पर्यटकाने बनवलेल्या व्हिडीओमुळे हा प्रकार जगाला कळाला आहे. 

आमच्याकडे जगातील सर्वात उंच झरा आहे, असे चीनकडू सांगण्यात येत होते. यूनताई माऊंटेन झरा असे याचे नाव होते. पर्यटक मोठ्या संख्येने या झऱ्याला भेट देत होते. पण कदाचित कोणी त्याच्या मुळाशी पोहोचले नव्हते. पण एका पर्यटकाने एक व्हिडीओ काढून सोशल मीडियात व्हायरल केला. यानंतर यूनताई माऊंटेन झऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. 

चीनच्या हेनान प्रांतामध्ये 314 मीटर ऊंच यूंताई झरा आहे. युनेस्को ग्लोबल जियोपार्क, युंताई माऊंटन जियोपार्कच्या आतमध्ये हा झरा आहे. अरबो वर्षे जुनी भूवैज्ञानिक संरचना पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात.  हा झरा 314 मीटर ऊंचीवर कोसळणारा आशियातील सर्वात ऊंच झरा असल्याचा दावा करण्यात येतो. 

हेही वाचा :  Praful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

पाहा व्हिडीओ

यूनताई माऊंटन फॉल्स हा चीनमधील सर्वोच्च अखंड धबधबा असल्याच्या दावा करण्यात आला. दरम्यान एका पर्यटकाने बनवलेल्या व्हिडीओत हे पाणी खडकाच्या आतील पाईपमधून येत असल्याचे दिसत आहे. या पोस्टनंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्पष्टीकरणही जारी केले आहे. 

धबधब्यातून पाणी येत असल्याचे दाखवणारा व्हिडिओ सोमवारी पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यानंतर ही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात लोकांनी शेअर केली आहे. बीबीसीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान यंताई पर्यटन उद्यानाच्या संचालकांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. पावसाअभावी पाणी कमी झालेले आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पाईपची मदत घेण्यात आली आहे. कमी पाणी पाहून पर्यटकांची निराशा होऊ नये, यासाठी असे केल्याची कबुली उद्यानाकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा :  नाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच

धबधब्याचा व्हिडिओ का व्हायरल झाला?
चीनी सोशल मीडिया साइट Douyin वर एका यूझर्सने धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पर्यटक यंताई धबधब्याच्या शिखरावर एका मोठ्या पाईपवर चढताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धबधब्याची पोलखोल असे लिहिले आहे. तसेच यंताई फॉल्सच्या उगमस्थानी झरा नसून पाईप आहे. हे पाहण्यासाठी मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असेही युजरने लिहिलंय. झऱ्याचे नाव सांगून पाईपमधून पाणी येतंय, ही पर्यटकांची फसवणूक असल्याची टीका करण्यात आलीय. 

बघता बघता हा व्हिडीओ जगभरात पसरला. यामुळे स्थानिक सरकारला याची दखल घ्यावी लागली. त्यांनी उद्यानातील झऱ्याच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांना पाठवले. तेथे काम करण्यांसोबत चर्चा केली. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली.

येथे झरा पाहायला येणाऱ्या पर्यटकांना सर्वात सुंदर नजारा पाहायला मिळावे अशी आमची इच्छा असते. पण सध्या उन्हाळा सुरु आहे. अशावेळी पाण्याची खूप कमतरता भासते. पर्यटकही नाराज होऊ नयेत म्हणून छोटा बदल केला आणि पाईपमधून पाणी सोडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे निसर्गाची हानी होत असल्याची टीका उद्यान प्रशासनावर करण्यात आली. यावरही उद्यानाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. ज्या पाण्याचा उपयोग झालाय ते झऱ्याचे पाणी होते. झऱ्याचे पाणी पंप होण्यासाठी पाईपचा वापर करण्यात आला. यामुळे नैसर्गिक लँडस्केपला कोणतीही हानी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा :  What is Marriage? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, 'जरा भेटायला ये'



Source link