घरची परिस्थिती बेताची.. कुठलाही क्लास न लावता हर्षल बनला सेल टॅक्स इन्स्पेक्टर

घरची परिस्थिती बेताची.. कुठलाही क्लास न लावता हर्षल बनला सेल टॅक्स इन्स्पेक्टर


MPSC STI Success Story कष्ट करायला कधीच पर्याय नसतो. त्यामुळे आपण ज्या परिस्थितीतून येतो ती परिस्थिती अधिक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बदलणे, ही आपली जबाबदारी आणि धाडस असते. हर्षलच्या लहानपणापासून घरची परिस्थिती बेताची…त्यात घरी जेमतेम शेती, वडील आजारी असल्याने घरचा सर्व भार हा हर्षलची आईवर होता. पण हर्षलच्या आई – वडिलांची इच्छा होती की आपल्या पोराने मोठे व्हावे, समाजात नाव कमावावे. त्याने तेवढे कष्ट देखील घेतले.

स्पर्धा परीक्षा म्हटलं की महागडे क्लासेस, आल्याच पण हर्षल मुंद्रे मात्र त्याला अपवाद ठरला हर्षलने आतापर्यंत कुठलेही क्लास न लावता समाज माध्यम आणि इंटरनेट याचा सकारात्मक उपयोग करत आपल्या ज्ञानात भर घालत यशाचा मार्ग सुकर केला आहे. यांनी घवघवीत यश संपादन करत सेल टॅक्स इन्स्पेक्टर हे पद मिळवले आहे. तीवसा तालुक्यात अनकवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गोवर्धन मुद्रे यांचा मुलगा हर्षल. त्यांचे संपूर्ण शिक्षण हे त्याचं तालुक्यात झाले. पुढे पदवी नंतर अमरावतीच्या वाचनालयात नियमितपणे वाचन करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.

तो साधारणपणे २०१५ पासून एमपीएससीचा अभ्यास करत होता. त्याला एसटीआय ही परीक्षा ५ वेळा एएसओ ही परीक्षा २ वेळा आणि राजसेवा मुख्य परिक्षेत ३ वेळा अपयश आले. मात्र मी संयम सोडला नाही. इतक्या वेळा अपयश येऊन देखील तो कोणत्याही मानसिक ताणात राहिला नाही. त्याने अभ्यासाची कास सोडली नाही. स्वतःवर विश्वास ठेवत अभ्यास करत राहिला. अभ्यासाची पद्धत बदलली, प्रश्न समजून घेतले, आयोगाने परीक्षेत रचनेत केलेला बदल प्रश्न विचारण्याची पद्धती वेळेचे नियोजन असा चिकित्सक अभ्यास करत त्याची राज्य कर निरिक्षक या पदी निवड झाली आहे.

हेही वाचा :  RCRB Recruitment 2023

त्याने प्रत्येक संधीचे सोने केले, अपयश आले तरी यशासाठी लढत राहिला‌. हर्षल गोवर्धन मुंद्रे या विद्यार्थ्यांने आपल्या प्रतिकूल परिस्थितीत मात करत घवघवीत मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Source link