घारीची नजर वगैरै वगैरै सगळे गैरसमज… या Optical Illusion मध्ये दडलेला मोबाईल शोधा तर मानलं

घारीची नजर वगैरै वगैरै सगळे गैरसमज… या Optical Illusion मध्ये दडलेला मोबाईल शोधा तर मानलं


Optical Illusion Viral Photo : मध्यंतरी एकामागून एक अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहायला मिळाले होते. उलटसुलट, वाकड्यातिकड्या आकृत्या, रेषा, आकारउकार आणि या साऱ्यातून तयार होणारे चेहरे, एखादा फोटो आणि बरंच काही या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये पाहायला मिळालं. गंमत म्हणजे या फोटोंकडे टक लावून पाहिल्यानंकर बऱ्याच वेळाच्या निरीक्षणानंतर जेव्हा आपल्यासमोर अंतिम उत्तर येतं तो क्षण प्रचंड आनंद देणारा असतो. यातून बक्षीस वगैरे काही मिळत नसलं तरीही उगाचच आपल्या निरीक्षण क्षमतेचं कौतुक करावंसं वाटतं. 

असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Whats App Groups मध्येही तो शेअर केला जात आहे. तुमच्यापर्यंत हा फोटो पोहोचला नसल्यास हरकत नाही, इथं तो पाहून घ्या. घरसबल्या एक मस्त Challange सर्वांना दिलं जात आहे. तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारताय का? 

नेमकं काय करायचंय? 

हे चॅलेंज स्वीकारल्यानंतर तुम्हाला इतकंच करायचंय की, या फोटोमध्ये दडलेला मोबाईल शोधायचाय. व्यवस्थित पाहा हा फोटो. यामध्ये साधारण राखाडी रंगामध्ये अनेक लहानलहान आकृत्या दिसत आहेत. या आकृत्या व्यवस्थित पाहिल्यास त्यात एक साधर्म्य आढळत आहे. ते म्हणजे यातल्या बहुतांश आकृत्या या दैनंदिन आयुष्यात वापरात येणाऱ्या गोष्टींच्या आहेत. 

हेही वाचा :  Crime News : डायरेक्ट प्रायव्हेट पार्टवरच वार केले आणि... बहिणीची छेड काढणाऱ्याला भावांनी अशी शिक्षा दिली की पोलिसही झाले शॉक

फोन, कॅलक्युलेटर, पत्र, घड्याळ, कॉम्प्युटर, टाय, डायरी, खुर्ची, डार्ट, पृथ्वी, स्टडी टेबल या आणि अशा बऱ्याच गोष्टी या फोटोमध्ये आहेत. पिन, टाचणी, प्रिंटर या कार्यालयीन वापरातील गोष्टीसुद्धा इथं पाहायला मिळत आहेत. पण, तुम्हाला यामध्ये मोबाईल दिसतोय का? 

आमच्या नजरेतून काहीच निसटत नाही… किंवा मग अमूक एका व्यक्तीची नजर घारीची आहे… वगैरे वगैरे असं तुम्ही म्हणत असाल, तर या मंडळींना आता कामाला लावा आणि त्यांची तीक्ष्ण नजर सिद्ध करुच द्या. व्यवस्थित पाहा हा फोटो. दिसतोय का मोबाईल तुम्हाला? थकलात? थोडा आणखी प्रयत्न करा. 

आजचा दिवस खर्ची घालून तुम्ही हा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करा. अगदीच मिळत नसेल तर आपण आता त्यांचं उत्तर देत आहोत. फोटोमध्ये बरोबर मध्यभागी पाहा. आता हळूच डाव्या बाजूला पाहा. तिथं तुम्हाला एक लहानसं घड्याळ दिसेल. आता त्याच घड्याळाच्या खाली पाहा. तो बघा, तिथेच दडलाय मोबाईल.हुश्श… सापडला एकदाचा! आहे की नाही ही गंमत… चला मग, तुमच्या घरातील बच्चेकंपनीला, मोठ्यांना आणि मित्रमंडळींना लावा कामाला. 



Source link