नाशिक केंद्रात १९ संस्थांचा सहभाग

नाशिक केंद्रात १९ संस्थांचा सहभाग



नाशिक केंद्रात १९ संस्थांचा सहभाग

राज्य नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी जाहीर 

नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य नाटय़ स्पर्धा आयोजनावर एकदाचे शिक्कामोर्तब झाल्याने रंगकर्मीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत नाशिक केंद्रावर धुळय़ाच्या संस्थाही सहभागी होणार असून एकूण १९ नाटय़प्रयोग होणार आहेत. २१ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत सायंकाळी सात वाजता परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात ही स्पर्धा होणार आहे.

 स्पर्धेच्या पहिल्या दिवशी २१ रोजी अमृततुल्य जीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राजेंद्र पोळ लिखित महाशून्य, २२ रोजी बॉश फाईन आर्ट्सच्या वतीने दत्ता पाटील लिखित स्वातंत्र्यांचा सावल्या, २३ रोजी ओझर येथील एच.ए.डब्ल्यू.आर.सी. रंगशाखेच्या वतीने शिरीष जोशी लिखित क्रकच बंध, २४ रोजी के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वतीने देवेन कापडणीस लिखित वर्तमान तमाशा, २५ रोजी लोकहितवादी मंडळाच्या वतीने विजय साळवे लिखित आज बस् इतकंच पुरे, २६ रोजी धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेच्या वतीने अभिजीत कबाडे लिखित कात, २७ रोजी येवला येथील महात्मा फुले अकादमीच्या वतीने विजय तेंडुलकर लिखित आधे अधुरे, २८ रोजी मैत्र जीवाचे फाउंडेशनच्या वतीने अनिल काकडे लिखित लपंडाव ही नाटके होणार आहेत.  १ मार्च रोजी नम्रता कलाविष्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शाम फडके लिखित तीन चोक तेरा, २ मार्चला नाटय़सेवा थिएटर्सच्या वतीने रोहित पगारे लिखित बाई जरा कळ काढा, ३ मार्चला रंगकर्मी थिएटर्सच्या वतीने डॉ. सोनाली गायकवाड लिखित ‘लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट’, ४ मार्चला विंध्यवासिनी बालविद्या विकास शिक्षण संस्थेच्या वतीने विजय तेंडुलकर लिखित ‘सफर’, ५ मार्चला साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राजा ठाकूर लिखित ‘कधीही न संपणारं नाटक’, ६ मार्चला संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिलीप जगताप लिखित ‘आला रे राजा’, ७ मार्चला एस. एम. एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने चैतन्य सरदेशपांडे लिखित ‘एक्सपायरी डेट’, ८ मार्चला पद्मतारा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महेश डोकफोडे लिखित ‘द लॉर्ड अ‍ॅण्ड द किंग’, ९ मार्चला सुरभी थिएटरच्या वतीने गिरीश जोशी लिखित ‘फायनल ड्राफ्ट’, १० रोजी विजय नाटय़ मंडळाच्या वतीने नेताजी भोईर लिखित ‘लग्नाला चला’ आणि ११ रोजी सचिन शिंदे अकॅडमी ऑफ परफॉर्मिग आर्ट्सच्या वतीने प्राजक्त देशमुख लिखित ‘हा वास कुठून येतोय?’ हे नाटय़प्रयोग होणार आहेत. प्राथमिक फेरीत १९ संघांच्या सादरीकरणानंतर दोन विजेते संघ मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीत नाशिकचे प्रतिनिधित्व करतील.

हेही वाचा :  ती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा

The post नाशिक केंद्रात १९ संस्थांचा सहभाग appeared first on Loksatta.

Source link