ईशा अंबानी म्हणते आनंदमध्ये वडिलांची प्रतिमा दिसते,जाणून घ्या आदिया – कृष्णाच्या आईबाबांची भन्नाट लव्हस्टोरी

ईशा अंबानी म्हणते आनंदमध्ये वडिलांची प्रतिमा दिसते,जाणून घ्या आदिया – कृष्णाच्या आईबाबांची भन्नाट लव्हस्टोरी


अंबानी कुंटुंबाची एकुलती एक मुलगी म्हणजे ईशा अंबानी. 2018 मध्ये 12 डिसेंबरला ईशा अंबानीने उद्योगपती आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. या लग्नाला भारतातील राजेशााही थाट पाहायला मिळाला. या लग्नात अंबानी कुटुंबाने दहा मिलियन डॉलर्स खर्च केल्याचे सांगितले जाते. मुकेश अंबानी लाडक्या ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशा अंबानीचे लग्न पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत यांच्या सोबत झाले. आता ईशा आणि आनंद आता जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. मुलीचे नाव आडिया आणि मुलाचे नाव कृष्णा आहे. पण तुम्हाला माहित आहे का यांची लव्हस्टोरी देखील खूपच भन्नाट आहे. आनंदने गुडघ्यावर बसून त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. चला तर मग जाणून घेऊयात त्यांची लव्हस्टोरी. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​अशी झाली पहिली भेट

महाराष्ट्रातील सर्वोच्च रिअल इस्टेट कंपनीचे मालक अजय पिरामल यांचा एकुलता मुलगा आनंद सोबत ईशा अंबानीचे लग्न झाले आहे. यावेळी आनंद 33 वर्षांचा आहे तर ईशा अंबानी 27 वर्षांची आहे. दोघांच्या वयात सहा वर्षांचा फरक आहे.जगाच्या नजरेत ईशा आणि आनंद हे बिझनेस रिलेशनमुळे लग्न करत आहेत पण हे अरेंज्ड नसून लव्ह मॅरेज आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल.

हेही वाचा :  UP election Result : बाहुबली नेत्यांना मतदारांचा दणका, 14 पैकी 10 जण पराभवाच्या वाटेवर

​अंबानी-पिरामल यांची व्यावसायिक मैत्री

आनंदचे आई-वडील स्वाती आणि अजय पिरामल मुकेश अंबानीचे जवळचे मित्र आहेत. व्यवसायाच्या संदर्भात त्यांचे मुकेश आणि त्यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. यामुळेच ईशा आणि आनंदच्या लग्नाला व्यापारी कुटुंबातील नात्याचे नाव दिले जात असले तरी सत्य काही वेगळेच आहे. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात बु़डाले होते.

​आनंदची ईशाच्या वडिलांशी मैत्री

मुकेश अंबानीपासून केले व्यवसायानिमित्त मुकेश आणि आनंद दिवसभर मीटिंगमध्ये असायचे. यादरम्यान मुकेशला आनंदला समजून घेण्याची संधी मिळाली. आणि एके दिवशी त्यांना समजले की फक्त आनंदच आपल्या मुलीचा जीवनसाथी असू शकतो.

​मुकेश अंबानींनी ईशाची आनंदशी ओळख करून दिली

यानंतर मुकेश अंबानी यांनी त्यांची मुलगी ईशाशीही याबाबत चर्चा केली. ईशाला आनंदबद्दल सांगितले. यावर ईशाने वडिलांकडे वेळ मागितला. ईशासह मुकेशने आनंदच्या पालकांसमोरही आपली इच्छा मांडली. त्यानंतर स्वाती आणि अजय पिरामल यांनी हा निर्णय पूर्णपणे आनंदवर सोडला. (वाचा :- माझी कहाणी: एका महिन्यात माझं १० किलो वजन वाढलं, नात्यातील नैराश्यामुळे माझ्या खाण्यावर माझे नियंत्रण नाही)

​ईशा आणि आनंदच्या प्रेमाची सुरुवात

व्यवसायानिमित्त आनंद अनेकवेळा मुकेश अंबानींच्या घरी यायचा. अंबानी समूहाच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पिरामल कुटुंबीयांची ये-जा असायची. त्यामुळे ईशा आनंद पिरामलला भेटली. काही भेटीनंतर दोघेही बोलू लागले आणि हळूहळू या गोष्टींचे प्रेमात रुपांतर झाले. 2016 पासून आनंद आणि ईशा एकमेकांना डेट करू लागले. फॅमिली फंक्शन्स व्यतिरिक्त दोघेही लंच आणि डिनर डेटला जाऊ लागले. बराच काळ डेट केल्यानंतर शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :  घरच्या अभ्यासाला कायमची सुट्टी? मुलांचा अभ्यास करुन घेण्याचं पालकांचं मोठं टेन्शन लवकरच संपणार

​आनंदने ईशाला असं केलं प्रपोज केले

श्लोका आणि आकाश अंबानीच्या एंगेजमेंटनंतर ईशा आणि आनंद दोघेही महाबळेश्वरला गेले होते. येथे आनंदने ईशाला खूप रोमँटिक पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले. आनंदच्या या विचारण्यावर ईशाने लगेच ‘हो’ म्हटलं आणि काही वेळातच त्यांच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली.

​ईशा-आनंदचे लग्न

एंगेजमेंट झाल्यानंतर लगेचच दोघांच्या लग्नाची तारीखही काढून टाकण्यात आली. 8 डिसेंबरपासून राजस्थानच्या उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि 12 डिसेंबरला त्यांचे लग्न आहे. या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये शाहरुख, सलमान, ऐश्वर्यापासून बॉलीवूडमधील सर्व बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती.

(वाचा :- प्रिती अदानीला अजिबात आवडले नव्हते गौतम अदानी, मग असं फुललं नातं आणि झाला 36 वर्षांचा सुखाचा संसार)

Source link