रोज अशा प्रकारे तुळशीची पाने चेहऱ्याला लावा, ७ दिवसात मुरुमांपासून ही होईल सुटका

रोज अशा प्रकारे तुळशीची पाने चेहऱ्याला लावा, ७ दिवसात मुरुमांपासून ही होईल सुटका


आपल्या देशात तुळशीकडे फक्त एक वनस्पती म्हणून पाहिलं जात नाही, तर तिच्या सोबत धार्मिक भावनाही जोडल्या आहेत. इतकंच नाही तर भारतात हजारो वर्षांपासून आयुर्वेदात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे ते केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. तुळशीमध्ये अनेक रोगांशी लढण्याची ताकद आहे. तुळस त्वचेशी संबंधित अनेक रोग आणि समस्या बरे करण्यास मदत करते आणि ते निरोगी ठेवते. हेच कारण आहे की प्रत्येकाने आपल्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येमध्ये याचा समावेश केला पाहिजे. आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात तुळशीचे फायदे. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडीया )

​पुरळ साठी

  • तुळस आणि कडुलिंबाची पाने घ्या आणि धुतल्यानंतर रात्रभर भिजवत ठेवा.
  • सकाळी बारीक करून पेस्ट बनवा.
  • पेस्टमध्ये थोडे मध घालून मिश्रण चेहऱ्यावर समान रीतीने लावा.
  • 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
  • रोज सकाळी स्वच्छ चेहऱ्यावर लावा. सात दिवसात तुम्हाला पुरळ कमी दिसतील.
हेही वाचा :  आर. आर. पाटील यांचे नाव घेत मीरा बोरवणकर यांचा अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

(वाचा :- वयाच्या 50 व्या वर्षीही विशीतील वाटाल, नितळ त्वचेसाठी बाबा रामदेवांनी सांगितलेले हे उपाय करा)

​ओट्सचे फेसपॅक

  • तुळशीची पाने बारीक करून पेस्ट बनवा. ते किमान एक चमचे असावे.
  • त्यात एक चमचा भरड ओट्स घाला.
  • चिमूटभर हळद घाला आणि एक चमचा मध घाला.
  • मिश्रण चेहऱ्यावर लावा , सुमारे 2-3 मिनिटे स्क्रब करा , नंतर 15 मिनिटे राहू द्या.
  • या मिश्रणाचा आठवड्यातून तीनपेक्षा जास्त वेळा वापरू नका.

(वाचा :- मेयोनीज फक्त सँडविचची चव वाढवत नाही तर घनदाट केसही देईल, हिवाळ्यातही केस मऊ आणि चमकदार राहातील)

​काळे डाग काढून टाकण्यासाठी

  • गरजेनुसार एका भांड्यात तुळशीची पेस्ट आणि संत्र्याची साल आणि मसूर पावडर एकत्र करा.
  • त्यात एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा लिंबाचा रस घाला.
  • मिश्रणात चिमूटभर हळद घाला.
  • ज्या ठिकाणी काळे डाग आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. हे चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर लावता येते.
  • सतत वापरल्याने, काळे डाग हलके होऊ लागतील आणि चमक वाढू लागेल.

(वाचा :- या धर्मामध्ये मुलींना शेवटच्या श्वासापर्यंत केस कापण्याची परवानगी नाही, शरीराचे केसही काढता येत नाहीत जाणून घ्या सर्व काही)

हेही वाचा :  संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप

​टोनर बनवा

  • तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुळशीचा टोनर वापरू शकता. हे घरी सहज तयार करता येते.
  • एका भांड्यात पाणी घेऊन त्यात धुतलेली तुळशीची पाने टाका.
  • पाण्याला उकळी आली की साधारण ५ मिनिटे सिम फ्लेमवर आणखी उकळू द्या.
  • तुळशीचे पाणी थंड होऊ द्या आणि नंतर ते गाळून घ्या.
  • तयार टोनर एका स्प्रे बाटलीत घाला. ते दररोज वापरले जाऊ शकते.

(वाचा :- केस खूप गळताहेत ? टक्कल पडण्याची भिती वाटते, काळ्याभोर केसांसाठी आवळ्याचा वापर करा, काही दिवसातच फरक जाणवेल)

(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. तो कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link