दाखवली ना लायकी! पाकिस्तानात उद्घाटन होताच नागरिकांनी अख्खा मॉल लुटून नेला; कर्मचारी म्हणाले ‘अवस्था बघा’

दाखवली ना लायकी! पाकिस्तानात उद्घाटन होताच नागरिकांनी अख्खा मॉल लुटून नेला; कर्मचारी म्हणाले ‘अवस्था बघा’


पाकिस्तानमध्ये ड्रीम बाजार मॉलच्या उद्घाटनावेळी एकच गोंधळ उडाला होता. मॉलच्या उद्घाटनाला लोकांना तुफान गर्दी केली होती. यानंतर काहींनी मॉलमध्ये घुसून तोडफोड केली. तर काहींनी चक्क संधी साधत चोरी केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत असून, काहींनी लायकी दाखवली ना अशी टीका केली आहे. 

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी वंशाच्या एका व्यावसायिकाने कराचीच्या गुलिस्तान-ए-जोहर परिसरात मॉल सुरु केला आहे. उद्घाटनाच्या दिवशी त्याने विशेष सवलत जाहीर केली होती. यामुळे 1 सप्टेंबला दुपारी 3 वाजता जेव्हा मॉलचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा तिथे नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. मॉलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये ड्रीम बाजार मॉलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे. 

डिस्काऊंटचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने हजर झाले होते. गर्दी इतकी होती, कर्मचाऱ्यांची गर्दीला आवरताना दमछाक होत होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचारी, सुरक्षारक्षक प्रयत्न करत असताना हे सर्व फोल ठरले. 

व्हिडीओत लोक शक्य होईल ते लुटून पळून गेल्याचं दिसत आहे. काही महाभाग तर ड्रीम बाजार मॉलमध्ये सामान लुटत असताना त्याचं रेकॉर्डिंगही करत होती. मॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कपडे, वस्तू पडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या सर्व गोंधळात मॉलच्या संपत्तीचंही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान हे रर्व घडत असताना पोलीस घटनास्थळी नव्हते असं वृत्त पाकिस्तानी न्यूज चॅनेल ARY News ने साक्षीदाराच्या हवाल्याने दिलं आहे. 

हेही वाचा :  "आम्हाला फक्त नरेंद्र मोदी पाहिजेत," पाकिस्तानी व्यक्तीचा VIDEO तुफान व्हायरल; पण तो असं का म्हणाला?

एका व्हिडीओत कर्मचारी लोकांनी मॉलमध्ये केलेली तोडफोड, लूट यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. “मॉलची अवस्था बघा. आम्ही हे लोकांच्या हितासाठी करत आहोत आणि जोपर्यंत त्यांना हे समजत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही,” असं तो म्हणाला. 



Source link