‘काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..’, सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, ‘हा मोदींना टोला’

‘काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..’, सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, ‘हा मोदींना टोला’


RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भावगत यांनी एका कार्यक्रमामधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे टोला लगावला असा दावा काँग्रेसने केला आहे. भागवत यांनी कोणाचंही थेट नाव आपल्या भाषणात घेतलं नाही. मात्र त्यांनी केलेल्या विधानावरुन त्यांचा रोख मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी दिलेल्या एका भाषणातील दाव्याच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. काँग्रेसनेही असाच दावा केला आहे.

कुठे बोलत होते भागवत?

गुरुवारी झारखंडमधील गुमला येथे विकास भारतीय या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये भागावत सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये संघाच्या ग्रामीण स्तरावरील कार्यकर्त्यांना ते बिष्णुपुर येथे संबोधित करत होते. आपल्या भाषणामध्ये भागवत यांनी हल्ली लोकांना सुपरमॅन बनायचं असतं असं विधान केलं. तसेच त्यांनी काही लोकांना देव देखील बनायचं असतं असंही म्हटलं. त्यांच्या या विधानाचा रोख मोदींच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :  Rahul Gandhi : राहुल गांधींचा अमेठीला 'टाटा गुड बाय', अमेठीऐवजी का निवडली रायबरेली?

भागवतांचं विधान काय?

“मानव झाल्यानंतर काही लोकांना सुपरमॅन बनायचं असतं. काहींना ‘देवता’ बनायचं असतं, काहींना ‘भगवान’ व्हायचं असतं तर काहींना ‘विश्वरुप’ व्हायचं असतं. मात्र कोणालाही मानवता नकोय, इंन्सानियत नको आहे,” असं मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले. 

काँग्रेस म्हणे मोदींवर निशाणा

काँग्रेसने या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना, हे विधान म्हणजे भागवतांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचं म्हटलं आहे. या विधानाला ‘भागवत बॉम्ब’ आणि ‘अग्नि मिसाइल’ असं म्हणत काँग्रेसने ‘नॉन-बायोलॉजिकल पीएम’वरील टीकेलाच पुढे शेपूट जोडलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी भागवत यांचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “मला विश्वास आहे की स्वयंभू नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नि मिसाइलची बातमी मिळाली असेल. या मिसाईने नागपूरवरुन झारखंड मार्गे लोक कल्याण मार्गाला लक्ष्य केलं आहे,” अशी कॅप्शन जयराम रमेश यांनी दिली आहे. 

भागवत नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणामध्ये भागवत यांनी, ‘एवढं पुढे पुढे करता एवढं पुढे पुढे करतात की त्याला काही मर्यादाच नाही. येथे पूर्णत्वाच्या मर्यादेला सीमेचं काही बंधन नाही अशी गोष्ट म्हणजे विकास. जिथपर्यंत विकास करायचा आहे तिथं पोहचल्यावर लक्षात येतं की या पुढेही जाता येईल. मात्र या साऱ्यात मानवता नाहीये, इन्सानियनत नाहीये. त्यांनी आधी चांगलं माणूस झालं पाहिजे. तिथे पोहचल्यानंतर मानवाला वाटतं की सुपरमॅन म्हणजे अति मानव व्हावं. चित्रपटांमध्ये दाखवतात मानवाला अलौकिक अशा गोष्टींने परिपूर्ण व्हायचं असतं. त्याला सुपरमॅन बनायचं असतं. त्याला अतिमानव बनायंच असतं. मात्र तो तिथेही थांबत नाही. त्यानंतर त्याला वाटतं की आपण देव व्हायला हवं. त्याला देव बनावसं वाटतं. मात्र देव म्हणता आमच्याहून भगवान मोठे आहेत. तर त्याला भगवान बनावसं वाटतं. भगवान म्हणतात मी तर विश्वरुप आहे. आता तर मी तुम्हाला एका रुपात दिसत आहे. मात्र संपूर्ण विश्व कोणत्याही आकाराशी शिवायचं रुप आहे ते मीच आहे. इथे तरी थांबणार की याहून पुढे काही आहे. हे त्याला ठाऊक नाही. विकासाला काही अंत नाही. यामध्ये बाहेरचा विकासही आला आणि अंतर्गत विकासही आला. विकास हा निरंतर गोष्ट आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांमध्ये थोडी असमाधानाची भावना असली पाहिजे. एवढं सारं केलं तरी हे राहिलं आहे, असं वाटलं पाहिजे,’ असं म्हटलं होतं.

हेही वाचा :  Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या 'या' भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

मोदींचं कनेक्शन काय?

भागवत यांच्या विधानाचा संबंध मोदींनी निवडणूक काळात दिलेल्या एका मुलाखतीशी लावला जातोय. या मुलाखतीमध्ये मोदींनी, “माझा जन्म जैविक पद्धतीने झालेला नाही, अशा निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे,” असं म्हटलं होतं. आपण नॉन-बायोलॉजिकल असल्याचं मोदींनी सूचित केलं होतं. आता याच विधानाशी भागवतांचं विधान जोडून पाहिलं जात आहे. 



Source link