MPSC द्वारे आता शिपाई पदे भरली जाणार, GR जारी, अंमलबजावणी कधीपासून?

MPSC द्वारे आता शिपाई पदे भरली जाणार, GR जारी, अंमलबजावणी कधीपासून?


सरळसेवा भरतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीद्वारे आता शिपाई पदे भरली जाणार असून याबाबत जीआर देखील जारी करण्यात आला आहे. २०२६ पासून यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

सामान्य प्रशासनाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत केली आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी एमपीएसी कक्षेत जी पदे भरती करायची आहेत त्याचा प्रस्ताव समितीकडे सादर करायचा आहे. यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, समिती जी पदे प्रधान्याने एमपीएसीकडे वर्ग करायची आहेत, त्याबाबत समिती शिफारस करणार आहे.

ज्या विभागांना पदभरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस, आयओएन या कंपन्यासोबत केला आहे. त्या विभागातील भरती प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतरच एमपीएससीमार्फत शिपाई पदांसाठी पदभरती केली जाणार आहे. म्हणजेच २०२६ नंतर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. २०२६ नंतर सर्व शासकीय कार्यालयातील गट ब आणि गट क संवर्गातील पदे भरती करण्यात येणार आहेत.

सरकारच्या विविध विभागातील वर्ग दोन आणि तीनची पदे ही ‘महापरीक्षा पोर्टल’द्वारे भरती केली जात होती. मात्र, तोतया उमेदवार आणि गुणांमध्ये फेरबदल केल्याच्या प्रकारांमुळे पोर्टल बंद करुन महाआयटी कंपन्यांतर्फे इतर कंपन्याना ही कामे दिला गेली होती. त्यालाही विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता २०२६ नंतर शासकीय विभागात शिपाई पदे एमपीएससीद्वारे भरती केली जाणार आहेत.

हेही वाचा :  ECHS मार्फत महाराष्ट्रात ''लिपिक''सह विविध पदांसाठी भरती

Source link