स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या ‘या’ ७ सवयी विद्यार्थ्यानी अंगीकारा, आयुष्यात व्हाल यशस्वी

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या ‘या’ ७ सवयी विद्यार्थ्यानी अंगीकारा, आयुष्यात व्हाल यशस्वी


Swami Vivekananda Quotes: भारतीय वेद आणि योगाचे तत्वज्ञान जगासमोर मांडून भारताला जगाच्या अध्यात्मिक नकाशावर आणणारे स्वामी विवेकानंद आजही तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. स्वामी विवेकानंद हे हिंदू संन्यासी होते आणि देशातील महान आध्यात्मिक व्यक्तींपैकी एक होते. अध्यात्मिक शिक्षक असण्यासोबतच ते एक विपुल विचारवंत, महान वक्ते आणि देशभक्त होते. त्यांनी भारतीय वेद-पुराण आणि तत्त्वज्ञान जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करुन दिली. त्यांचे संपूर्ण जीवन हे शिक्षण आहे. त्यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे आणि भविष्यातही राहील. त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत ज्या प्रत्येकासाठी एक धडा आहे.

१८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेले भाषण आजही कोणत्याही भारतीयाचे सर्वात प्रभावी भाषण मानले जाते. तरुणांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांनी काही धडे दिले आहेत, ज्याचा अवलंब करून यशाचा मार्ग सुकर करता येतो. विद्यार्थ्यांनी आजपासूनच या सवयी आत्मसात कराव्यात.

UPSC Success Story: मनरेगामध्ये रोजंदारी करायचे आई-वडील, मुलगी शिकली आणि IAS बनली

स्वामी विवेकानंद यांचे ७ विचार

१) दिवसातून एकदा स्वतःशी बोला. तुम्ही असे न केल्यास, दररोज तुम्ही जगातील विद्वानांशी बोलण्याची संधी गमावाल.

हेही वाचा :  Swami Vivekananda Jayanti 2023 : स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 10 महत्त्वपूर्ण संदेश, जे ठरतील आयुष्यासाठी महत्त्वाचे

२)कल्पनेवर लक्ष केंद्रित करा. हा विचार तुमचे जीवन बनवा. याबद्दल विचार करा, याबद्दल स्वप्न पहा. या कल्पनेला सार्थ करण्यासाठी तुमचे हृदय, मन, स्नायू आणि शरीराचा प्रत्येक अवयव लावा. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे.

३) उठा! जागे व्हा! आणि तुमचे ध्येय साध्य करा.

४) जेव्हा विचार पूर्णपणे मनावर वर्चस्व गाजवतो, तेव्हा ती वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्थिती बनते.

५) आपण जितके पुढे जाऊ आणि इतरांना मदत करू तितके आपले हृदय अधिक शुद्ध होईल. अशा लोकांमध्ये देव वास करतो.

६)आपले विचार आपल्याला घडवतात. त्यामुळे आपल्याला काय वाटते याची विशेष काळजी घ्या. विचार शब्दांपेक्षा जास्त टिकून राहतात आणि पुढे जातात.

७) विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्यात आहेत. आपणच डोळ्यांवर हात ठेवतो आणि अंधारात ओरडतो.

‘या’ सवयी करिअर आणि अभ्यासासाठी घातक, तुम्हालाही असतील तर आजच सोडा

Source link