प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा ‘हा’ नियम

प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा ‘हा’ नियम


Platform Ticket Travel: रेल्वे स्थानकात थांबायचे असेल किंवा स्थानकातून जायचं असेल तर प्लॅटफॉर्म तिकिट काढावे लागते. फक्त 10 ते 20 रुपयांचे हे प्लॅटफॉर्म तिकिट तुमच्या खूप कामी येऊ शकते.  प्लॅटफॉर्म तिकिट घेतल्यास तुम्ही दोन तास स्थानकात थांबू शकता. पण तुम्हाला हे माहितीये का प्लॅटफॉर्म तिकिटावर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवासदेखील करु शकता. भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी काही वेगळे नियम आखून दिले आहेत. हे नियम तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिटांवर रेल्वेने प्रवास करण्याचा अधिकारे देतात. मात्र त्यासाठी एक अट आहे. 

रेल्वेतून प्रवास करण्यासाठी लोक महिनाभर आधी रिझर्व्हेशन करतात. रिझर्व्हेशनसाठी दोन पद्धतीने तिकिट बुक केली जाते. ऑनलाइन आणि ऑफलाइन. मात्र, तुम्हाला अचानक प्रवास करायचा झाल्यास तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटचा आधार घेऊ शकता. रेल्वेचे नियम काय सांगतात जाणून घेऊया. 

प्लॅटफॉर्म तिकिटाने रेल्वेचा प्रवास 

तुमच्याकडे जर प्लॅटफॉर्म तिकिट असेल आणि तुम्ही ट्रेनमध्ये चढलात तर घाबरण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही टिसीकडे जावून तुमचं तिकिट काढू शकता. खरं तर या रेल्वेचा नियम आहे. इमरजन्सीच्या काळात तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये चढू शकता. मात्र, त्यानंतर तुम्हाला लगेचच TTEसोबत संपर्क करावा लागेल. त्याचबरोबर जिथे तुम्हाला जायचं आहे त्या स्थानकापर्यंतचे तिकिट काढावे लागेल. सीट उपलब्ध नसल्यास TTE तुम्हाला रिझर्व्ह सीट देण्यास नकार देईल. मात्र, प्रवास करण्यापासून थांबवणार नाही. असा स्थितीत प्रवाशांकडून 250 रुपये पेनल्टी आणि प्रवासाचे भाडे वसूल करुन घेण्यात येईल.

हेही वाचा :  अपूर्ण नेमळेकरची खवय्येगिरी, बिर्यानीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली; "पोटातून..." | apurva nemlekar share biryani making video on instagram goes viral

प्लटॅफॉर्म तिकिटचा आणखी एक फायदा आहे. ज्या स्टेशनवरून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे तिथूनच तिकिटाचे भाडे भरावे लागेल. भाडे वसूल करताना तेच स्थानक  म्हणूनही ग्राह्य धरले जाईल. प्रवाशाकडून तो ज्या क्लासमध्ये प्रवास करणार आहे त्याच क्लासमध्ये भाडे आकारले जाईल.

ट्रेन सुटल्यास मिळणार रिफंड 

ट्रेन चुकून सुटली तर अशावेळी तिकिटांचे पैसे परत मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडतो. ट्रेन मिस झाल्यावर प्रवासी TDR भरुन त्यांच्या तिकिटांच्या बेस फिअरचा 50 टक्का अमाउंट रिफंड करु शकतात. मात्र लवकरात लवकर तुम्हाला हे काम करता आलं पाहिजे. 

तुमची सीट कोणालाही देऊ शकत नाही TTE

जर तुमची ट्रेन सुटली तर TTE पुढील दोन स्थानकापर्यंत तुमची सीट कोणालाही अलॉट करु शकत नाही. पुढील दोन स्थानकात ट्रेन येण्याच्या आधी पोहोचून तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करु शकतात. मात्र, दोन स्थानकांनंतर TTE RAC तिकिट असलेल्या प्रवाशाला ही सीट देऊ शकतो. 



Source link