पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाण

पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाण


IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांचा कुटुंबीयांचे पंकजा मुंडे यांच्याशी राजकीय संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याला कारण ठरला तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका चेकचा फोटो. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची मदत केल्याचा दावा केला जात आहे. 3 ऑक्टोबर 2023ला 12 लाखांची मदत केल्याचा उल्लेख असलेला एका चेकचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. दरम्यान याबाबत अद्याप पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. 

पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांचे पंकजा मुंडेंच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध? असल्याचा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. तसंच, पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकरांनी नगरमधल्या मोहोटा देवीला साकडं घातलं असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. दिलीप खेडकरांचे भाऊ माणिक खेडकर पाथर्डीतील भाजपचे तालुकाध्यक्ष राहिलेत, असंही समोर येतंय. त्यामुळं पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे पंकजा मुंडे यांच्याशी संबंध असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. 

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा 12 लाखांचा चेक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई केल्यानंतर मनोरमा खेडकर यांनी बारा लाख रुपयांचा चेक मदत म्हणून दिल्याचं बोललं जातंय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने 19 कोटी रुपयासाठी कारवाई केली होती. त्यानंतर मुंडे समर्थकांकडून मदतीचा ओघ राज्यभरातून येत होता. यावेळी मनोरमा खेडकर यांनी परिवर्तन प्रतिष्ठानच्या भालगाव नावाने बारा लाख रुपयांचा चेक दिला होता. हा चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरमा खेडकर या चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी समर्थकांनी देऊ केलेली रक्कम नाकारली होती. मात्र मनोरमा खेडकरांनी दिलेल्या या चेकची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

हेही वाचा :  भाजपाच्या ‘400 पार’मध्ये अडथळा ठरल्याने निवडणूक आयुक्तांचा राजीनामा? मोदी-शाहांचा उल्लेखासहीत सवाल

पूजा खेडकर परिवाराकडून पंकजा मुंडेसाठी देवीला मुकुट अर्पण

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नगर जिल्ह्यातील मोहटा देवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस खेडकर कुटुंबीयांनी केला होता आणि त्यानुसार हा चांदीचा मुकुट 22 मार्च रोजी अर्पण करण्यात आला होता. पंकजा मुंडे यांच पक्षकडून पुनर्वसन व्हावं आणि त्यांना पद मिळावं अस साकडं खेडकर यांनी देवीला घातलं होतं.

भाजप कडून पंकजा यांना राज्यसभे ऐवजी लोकसभेची उमेदवारी मिळाली तरी देखील खेडकर यांनी चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला. नंतर काही दिवसांनी दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. 

पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता

वादाच्या भोवऱ्याच अडचलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता. पूजा खेडकर यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता असून, त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी होणार आहे. पूजा खेडकर प्रकरणाची थेट पीएमओ कार्यालयाने दखल घेतली आहे. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांना मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

हेही वाचा :  '72 तासात उत्तर द्या', महिला कुस्तीपटूंच्या आरोपानंतर केंद्राची कुस्ती महासंघाला नोटीस  



Source link