मोलकरीण बनून घरात शिरली, गतीमंद मुलाबरोबर काढले लग्नाचे खोटे फोटो; 200 कोटींसाठी रचला खतरनाक प्लान

मोलकरीण बनून घरात शिरली, गतीमंद मुलाबरोबर काढले लग्नाचे खोटे फोटो; 200 कोटींसाठी रचला खतरनाक प्लान


Treniding News : पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी टोळी (Gang) अतिशय हुशारीने श्रीमंत व्यक्तीना लुबाडत होती. एका डॉक्टरला लुबाडण्याआधी या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील एक महिला मोलकरीण बनून डॉक्टरच्या घरात शिरली. त्यानंतर डॉक्टरच्या गतिमंद मुलाबरोबर खोट्या लग्नाचे खोटे फोटो (Fake Marriage Photo) काढले. या फोटोंच्या आधारे डॉक्टरला ब्लॅकमेल करत या टोळीने त्याची 200 कोटींची मालमत्ता हडपण्यासाठी कट रचला. पण पोलिसांनी वेळीच हा कट उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेसह टोळीच्या मास्टरमाईंडलाही अटक केली आहे. 

काय आहे नेमकी घटना?
उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) गाझियाादमधली ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीने आधी श्रीमंत डॉक्टरचं घर हेरलं. त्यानंतर टोळीतील एका महिलेला वृद्ध डॉक्टर दाम्पत्याकडे मोलकरीण म्हणून पाठवलं. त्या महिलेचं वृद्ध दाम्पत्याच्या गतिमंद मुलाशी लग्न लावलं. यादरम्यान वृद्ध महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. मृत्यू आधी आपल्या गतिमंद मुलाचं मोलकरणीशी लग्न लावून दिल्याची माहिती टोळीने त्यांच्या नातेवाईकांना दिली. तसंच त्यांच्या संपत्तीवर दावा केला. 

पण वृद्ध दाम्पत्याच्या विवाहीत मुलीने  पोलिसात तक्रार दाखल करत हा संपूर्ण डाव उघड केला. पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मोलकरीण बनून घरात प्रवेश करणाऱ्या महिलेची आधीच तीन लग्न झाली होती आणि घटस्फोटही झाला. 

हेही वाचा :  SC मधील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे, गळा दाबण्याआधी तिच्या...; Postmortem ने उलगडलं रहस्य

अशी होती मोडस ऑपरेंडी
या टोळीने श्रीमंत व्यक्तींना लुटण्यासाठी आपली टोळी बनवली होती. उत्तर प्रदेशच्या मुरादनगरमध्ये राहाणाऱ्या डॉ. सुधा सिंह या यूआईएमटी कॉलेजमध्ये चान्सलर होत्या. यादरम्यान सचिन नावाच्या आरोपीने डॉ. सुधा सिंह यांच्याशी ओळख वाढवली. यातूनच सचिनचं त्यांच्या घरी येणं-जाणं वाढलं. सचिने डॉ. सुधा सिंह यांच्या घरी प्रिती नावाच्या महिलेला मोलकरीणचं काम मिळवून दिलं. डॉ. सुधा सिंह यांचा मुलगा गतिमंद आहे. सुधा सिंह यांचं ब्रेन वॉश करुन सचिनने प्रीतीचं लग्न त्यांच्या गतिमंद मुलाशी लावून देण्याचा सल्ला दिला. डॉ. सुधा सिंह यांनाही हा सल्ला पटला आणि त्यांनी आपल्या मुलाचं प्रितीशी लग्न लावून दिलं. 

काही महिन्यांनी डॉ. सुधा सिंह यांचा मृत्यू झाला. ही संधी साधत प्रितीने डॉ. सुधा सिंह यांच्या 200 कोटी रुपयांच्या संपत्तीवर आणि अलिशान बंगल्यावर दावा केला. डॉ. सुधा सिंह यांच्या मुलाशी आपलं लग्न झालं असून संपूर्ण मालमत्तेवर आपला अधिकार असल्याचं प्रितीने सिंह यांच्या नातेवाईकांनाी सांगितलं. पण डॉ. सुधा सिंह यांची विवाहीत मुलगी आकांशा हिने यावर आक्षेप घेतला. पण प्रिती आणि सचिनने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पण आकांक्षा यांनी न घाबरता पोलिसांत तक्रार दाखल केली. 

हेही वाचा :  ईsss; 'या' आहेत सर्वात घाणेरड्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या; यातून चुकूनही प्रवास करु नका

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. मोलकरीण प्रिती ही सोनीपत इथली राहाणारी असून तिची याआधी 3 लग्न झाली आहेत, तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही तपासात समोर आलं. या संपूर्ण प्लानचा मास्टरमाईंड सचिन होता. सचिनवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात गाझियाबादमध्ये फसवणूक, खंडणी असे अर्धा डझन गुनेह दाखल आहेत. याशिवाय टोळत आणखी दोन महिला होत्या, पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. 



Source link