Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला

Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला


Gratuity Calculation: प्रत्येक नोकरदार वर्गासाठी त्यांचा पगार आणि त्या पगारासमवेत मिळणारे इतर फायदे जितके महत्त्वाचे असतात तितकेच, किंबहुना त्याहूनही महत्त्वाचे असतात ते एखाद्या कंपनीचे नियम आणि Policies. प्रत्येक कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं काही नियम लागू केले जातात आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक असतो तो म्हणजे ग्रॅच्युटी. 

पीपीएफ आणि पेंशनच्या रकमेप्रमाणंच ग्रॅच्युटीचंही महत्त्वं असतं. कर्मचाऱ्यांनी एखाद्या कंपनीमध्ये दिलेल्या अविरत सेवेचा मोबदला म्हणून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम दिली जाते. एखादा कर्मचारी अनेक वर्षांसाठी एखाद्या कंपनीमध्ये सेवेत असल्यास त्याला कंपनी सोडल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर ही रक्कम मिळते. 

ग्रॅच्युटीच्या स्वरुपात दिली जाणारी ही रक्कम कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदत देऊ करते. पण, सरसकट प्रत्येक कर्मचारी ग्रॅच्युटीसाठी पात्र असतोच असं नाही. मग ही ग्रॅच्युटी मिळते तरी कोणाला? जाणून घ्या… 

Gratuity Payment Act 1972 नुसार 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारीसंख्या असणाऱ्या कंपनीमध्ये 5 वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवेसाठी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली जाते. यामध्ये कर्मचाऱ्याचं अखेरचं वेतन आणि नोकरीच्या सेवेच्या वर्षांच्या आधारे एक रक्कम देऊ केली जाते. यासाठी (अखेरचं वेतन) x (सेवेची वर्ष) x (15/26) असं सूत्र ग्राह्य धरलं जातं. 

हेही वाचा :  'ठरलंय तेवढं बोलायचं अन्...' CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा

 

वरील सूत्रानुसार अंतिम वेतनामध्ये अखेरच्या 10 महिन्यांची सरासरी काढली जाते. यामध्ये मूळ वेतन, डियरनेस अलाउन्स आणि कमिशन जोडलं जातं. सोप्या भाषेत समजावं तर, दरवर्षी नोकरीवर 15 दिवसांच्या वेतनाची ग्रॅच्युटी दिली जाते. जिथं एक महिना 26 दिवसांचा ग्राह्य धरला जातो, जिथं 4 रविवारही जोडले जातात. 

पैशांचं गणित समजून घ्या…. 

तुम्ही एखाद्या कंपनीत पाच वर्षे नोकरी केली आणि तुमचा शेवटचा पगार 35000 रुपये इतका आहे, तर तुमची ग्रॅच्युटी असेल 1,00,961 रुपये. तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल आणि तुमचा शेवटचा पगार असेल 50000 रुपये तर, तुमची ग्रॅच्युटी असेल 2,01,923 इतकी ग्रॅच्युटी मिळेल. एखादी कंपनी ग्रॅच्युटी पेमेंट अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत नसेल, तरीही तुम्हाला या रकमेचा लाभ घेता येऊ शकतो फक्त इथं हिशोबाचं गणित मात्र बदलू शकतं. 



Source link