भारताची सलामीवीर स्मृती मांधनाची प्रकृती स्थिर

भारताची सलामीवीर स्मृती मांधनाची प्रकृती स्थिर


ICC Women’s World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात  (India Women vs South Africa Women) फलंदाजीदरम्यान भारताची सलामीवीर स्मृती मांधनाच्या (Smriti Mandhana) डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळं तिला ‘रिटायर्ड हर्ट‘ होऊन पव्हेलियनमध्ये परतावं लागलं होतं. मात्र, आता तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीनं (BCCI) दिलीय.

आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने टाकलेला बाऊन्सर स्मृतीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर भारतीय संघाच्या डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळी तिला फलंदाजी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तिला त्रास जाणवत असल्यानं तिनं मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तिला खबरदारी म्हणून उर्वरित सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, स्मृती मांधनाची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलंय. 

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारत पाकिस्तानशी भिडणार
विश्वषकातील पहिल्या सामन्यात भारताचा संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. यातच स्मृती मांधनाचं अनफीट असणं भारतासाठी मोठा धक्का असू शकतो. स्मृती मांधनाचा हा दुसरा महिला विश्वचषक असेल. या विश्वचषकात ती महत्वाची भूमिका बजावेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. 

हेही वाचा :  पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

स्मृती मांधनाची एकदिवसीय कारकीर्द
स्मृती मांधना ही आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील फलंदाज आहे. तिने 64 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41.71 च्या सरासरीने 2461 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link