वयाच्या २५व्या वर्षी आपले आई-वडील गमावले; पण अंशिकाने आयपीएस होऊन आई-वडिलांचे नाव कमावले

वयाच्या २५व्या वर्षी आपले आई-वडील गमावले; पण अंशिकाने आयपीएस होऊन आई-वडिलांचे नाव कमावले


UPSC Success Story लहानपणीचा हक्काचा आधार गेला….हा विचार पण करवत नाही. कारण, आपल्या जडणघडणीच्या काळात हक्काचा आधार असणे ही गरज असते. अनेक स्वप्नांना भरारी घेण्यासाठी बळ देते. अंशिका जैन यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आपले आई-वडील गमावले. त्यानंतर काका आणि आजीने अंशिकाला सांभाळले आणि उच्च शिक्षित केले.

अंशिका ही मूळची दिल्लीची…तिचे बालपण हे खडतर गेले. पण तिची आजी शिक्षिका होती. तिने घरात शैक्षणिक वातावरण निर्माण केले. त्यामुळे अंशिकाला देखील शिक्षणाची गोडी लागली. तिने दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून बीकॉम पूर्ण केलं. याच दरम्यान यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. तिची आजी नेहमी म्हणायची की, अंशिका…तू एकदिवस नक्कीच सरकारी अधिकारी होशील. हे शब्द अंशिकाने मनाच्या कोपऱ्यात अक्षरशः कोरून ठेवले… आणि अभ्यासाची वाट धरली.

आपला आर्थिक हातभार लागावा म्हणून तिने ग्रॅज्युएशननंतर अंशिका यांना देशातील एका प्रसिद्ध मल्टीनॅशनल कंपनीत चांगली नोकरी मिळवली त्यांनी ती नाकारली आणि तिच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. दुर्दैवाने, २०१९ मध्ये परीक्षेची तयारी करत असतानाच त्यांनी आजी देखील गमावली. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता, कारण त्यांनी त्यांची सपोर्ट सिस्टम गमावली होती.

हेही वाचा :  MPSC मेगाभरती : ऐतिहासिक ८०००+ जागांसाठी भरती ; गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

पण स्वतःला सावरलं आणि पुन्हा अभ्यास सुरू केला. यात तिला खूपदा अपयश आले पण तिने जिद्दीने पुन्हा – पुन्हा अभ्यास केला.अखेर, पाचव्या प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यश संपादन केलं. ऑल इंडिया रॅंक ३०६ मिळवून त्यांनी भारतीय पोलीस सेवेत अधिकारी पद मिळवलं आणि अंशिका आय.पी.एस झाली. आई-वडील गेल्यानंतर अंशिकाने मोठं अधिकारी व्हावं असं तिच्या आजीचं स्वप्न होतं….ते पूर्ण झालं.

Source link