1 वर्ष डेट केल्यानंतर लग्न, 12 दिवसांनी कळलं पत्नी ‘ती’ नाही तर ‘तो’! शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता..

1 वर्ष डेट केल्यानंतर लग्न, 12 दिवसांनी कळलं पत्नी ‘ती’ नाही तर ‘तो’! शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता..


Bride Turns Out To Be Man After 12 Days Of Wedding Groom Was Shock: ते दोघे प्रेमात पडले, एक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघांच्या संमतीने लग्नही झालं. मात्र त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे नवऱ्या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नानंतर तब्बल 12 दिवसांनी आपण ज्या व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे, जिच्याबरोबर आपण मागील एका वर्षापासून फिरतोय ती व्यक्ती महिला नसून पुरुष असल्याचं नवऱ्या मुलाला समजल्यानंतर काय करावं हे त्याला कळेनासं झालं. पैशांसाठी मुलीच्या वेशातील हा पुरुष नवरदेवाची फसवणूक करत होता अशी माहिती समोर आली आहे.

इन्स्टाग्रामवरुन ओळख अन् अनेकदा प्रत्यक्षात भेटले

एके नावाचा हा 26 वर्षीय नवरदेव साधारण वर्षभरापूर्वी अदिंदा कांन्झा नावाच्या 26 वर्षीय ‘महिले’बरोबर इन्स्टाग्रामवरुन बोलू लागला. त्यानंतर ते प्रत्यक्षात भेटून एकमेकांना डेट करु लागले. जेव्हा हे दोघे एकमेकांना इंडोनेशियामधील त्यांच्या घराजवळ भेटायचे तेव्हा अदिंदा ही पारंपारिक इंडोनेशियन कपडे परिधान करायची. मुस्लीम बहुल देशातील पारंपारिक वेशभूषेचा भाग असलेला नकाब कायम अदिंदाच्या तोंडावर असायचा आणि त्यामुळे तिचा चेहरा झाकलेला असायचा, असं ‘द मिरर’च्या वृत्तात म्हटलं आहे. आपली प्रेयसी फारच धार्मिक असल्याचं वाटून एकेने कधी तिला याबद्दल हटकलं नाही. 

हेही वाचा :  Touchwood: लोकं वारंवार एखादी बाब सांगितल्यानंतर 'टचवूड' का म्हणतात? जाणून घ्या कारण

लग्नानंतर शरीरसंबंधांना नकार

वर्षभराने एकेच्या घरीच दोघांनी निकटवर्तियांच्या उपस्थितीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या घरचं कोणीही लग्नाला उपस्थित नसतानाच 12 एप्रिल रोजी घरच्या घरी झालेल्या छोट्याश्या समारंभात दोघांचं लग्न झालं. लग्नाला घरचे कोणी का आले नाही याबद्दल मुलाकडच्यांनी विचारलं असता, आपलं या जगात कोणीच नाही असं अदिंदाने सांगितलं. मात्र लग्नानंतर एकेला आपल्या पत्नीबद्दल वेगळीच शंका येऊ लागली. कारण जेव्हा जेव्हा तो तिच्या जवळ जाण्याचा आणि शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा तेव्हा ती त्याला थेट किंवा अप्रत्यक्षपणे नकार द्यायची. माझी मासिक पाळी सुरु आहे किंवा मला बरं वाटतं नाही असं सांगून अदिंदा एकेपासून लग्नानंतर दूरच राहत होती. अदिंदा एकेला जवळ येऊ देत नव्हती.

पत्ता शोधून तिच्या घरी पोहोचला नवरदेव

सर्वांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा अदिंदाने एकेच्या घरच्यांशी बोलणं बंद केलं आणि ती दिवसभरही घरात चेहरा झाकूनच फिरायची. लग्नानंतर 12 दिवसांनी एकेने त्याच्या पत्नीचा पत्ता मिळवला आणि तो तिथे पोहोचला असता त्याला धक्काच बसला. अदिंदाचे पालक जिवंत असल्याचं त्याला समजल्याचं ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचा :  Maharashtra Strike Update : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

अदिंदाच्या पालकांनी एकेशी बोलण्याची तयारी दर्शवली. मात्र अदिंदाच्या पालकांनी आपलं आपत्य मुलगी नसून मुलगा असल्याचं एकेला सांगितलं तेव्हा एकेला आधी विश्वासच बसला नाही. 2020 पासून अदिंदाना महिलांसारखे कपडे घालून फिरतो असं त्याच्या पालकांनी सांगितलं. आपला मुलगा रिलेशनशीपमध्ये आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. अदिंदाचा आवाज महिलेसारखा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचा आवाज आणि बोलण्याची शैली ही महिलांसारखी असल्याने त्याच्याबद्दल कोणाला शंका आली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

आता होणार एवढी मोठी शिक्षा

पोलिसांनी अदिंदा नाव सांगणाऱ्या ईएसएचला अटक केली आहे. त्याने कबुली जबाबामध्ये एकेला आर्थिक गंडा घालण्याच्या उद्देशानेच आपण लग्न केलं होतं असं म्हटलं आहे. आता त्याच्याविरोधात फसवणूकीचा खटला चालवला जाणार असून त्याला 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.



Source link