‘भारतीयांमध्ये द्वेष…’, बांगलादेश टीमच्या भारत दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे संतापले; BJP, BCCI चाही उल्लेख

‘भारतीयांमध्ये द्वेष…’, बांगलादेश टीमच्या भारत दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे संतापले; BJP, BCCI चाही उल्लेख


Aaditya Thackeray Oppose Bangladesh Tour of India: भारत आणि बांगलादेशदरम्यान 19 सप्टेंबरपासून चेन्नईमधील एम. ए. चेन्नस्वामी स्टेडियममध्ये कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाबरोबरच बांगलादेशचा संघही चेन्नईमध्ये काही दिवसांपूर्वीच दाखल झाला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाहिला सामना 19 ते 23 सप्टेंबदरम्यान तर दुसरा सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान खेळवला जाणार आहे. मात्र एकीकडे बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्याला परवानगी कशी दिली? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी केला आहे. या मालिकेसंदर्भात सत्ताधारी मोदी सरकारची दुटप्पी भूमिका का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

या दौऱ्याला परवानगी कशी काय दिली?

आदित्य ठाकरेंनी त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन या मालिकेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेत. “…तर बांगलादेशचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. मला आता परराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घ्यायचं आहे की, काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरुन सांगितलं जात आहे त्याप्रमाणे मागील 2 महिन्यांपासून बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचार होत आहे का?” असा प्रश्न आदित्य यांनी विचारला आहे.

हेही वाचा :  ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवाल

तसेच पुढे बोलताना, “या प्रश्नाचं उत्तर होय असं असेल आणि हिंदू तसेच अन्य अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचार होत अशेल तर भाजपाकडून चालवल्या जाणाऱ्या भारत सरकारने बीसीसीआयसंदर्भात एवढी मवाळ भूमिका घेत या दौऱ्याला परवानगी कशी काय दिली?” असा सवाल केला आहे. त्याप्रमाणे, “हिंसाचार होत नाही असं उत्तर असेल तर परराष्ट्र मंत्रालय सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधील बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंसाचारांच्या बातम्यांसंदर्भात समाधानी आहे का?” असंही आदित्य यांनी विचारलं आहे.

नक्की वाचा >> ‘बुमराह माझ्याकडून शिकला, रोहितला माझ्यासमोर चाचपडतो’; ‘पाकिस्तानी’ क्रिकेटरचा दावा

दुटप्पी भूमिका

“इथे एकीकडे त्यांचे (सत्ताधाऱ्यांचे) ट्रोलर्स इतर देशामध्ये म्हणजेच बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत आपल्या भारतीयांमध्ये द्वेष निर्माण करत आहेत तर दुसरीकडे बीसीसीआय त्याच बांगलादेशच्या संघाचा पाहुणचार करत आहे,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी ही दुटप्पी भूमिका का असा सवाल उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> आयुष्य पणाला लागलं असेल तर कोणाला बॅटींगला पाठवशील? युवराजने धोनी, विराटऐवजी घेतलं ‘हे’ नाव

निवडणुकीपुरता प्रोपोगांडा आहे का?

“या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवणारे आता बीसीसीआयशी बोलत का नाहीत? त्यांना प्रश्न का विचारत नाहीत याचं मला आश्चर्य वाटत आहे. की हा फक्त भारतात द्वेष पसरवून निवडणुकीपुरता प्रोपोगांडा तयार करण्याचा कट आहे?” अशी शंकाही आदित्य यांनी उपस्थित केली आहे.

हेही वाचा :  IPL 2022 Rule Change: BCCI ने आयपीएल २०२२ साठी बदलले 'हे' महत्त्वाचे नियम! | IPL 2022 Rule Change: BCCI changes 'these' important rules for IPL 2022!



Source link