खराब पाण्यात आंघोळ करणं तरुणाला भोवलं! नाकाद्वारे शरीरात घुसला मेंदू खाणारा अमीबा अन् नंतर असं काही घडलं….

खराब पाण्यात आंघोळ करणं तरुणाला भोवलं! नाकाद्वारे शरीरात घुसला मेंदू खाणारा अमीबा अन् नंतर असं काही घडलं….


14 वर्षांच्या मुलाला तलावातील घाणेरड्या पाण्यात आंघोळ करणं जीवावर बेतलं आहे. मुलाचा अमीबामुळे होणाऱ्या संक्रमणाने जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा 14 वर्षांचा मुलगा खराब पाण्याने भरलेल्या तलावात आंघोळ करायला गेला तेव्हा त्याला संक्रमणाची लागण झाली. नाकाद्वारे अमीबाने शरीरात प्रवेश केला. आणि त्याचं संक्रमण झालं.

या मुलावर कोझिकोड या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेन इन्फेक्शनमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी मृदुल नावाच्या या 14 वर्षांच्या मुलाची बुधवारी रात्री 11.20 मिनिटांनी मृत्यू झाल्याचं सांगितलं. 

‘नेगलेरिया फाउलेरी’ ची दहशत 

या जीवघेण्या अमिृीबाचे नाव नायगलेरिया  (Naegleria fowleri) आहे. याला बोली भाषेत ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असेही म्हणतात. त्याचबरोबर वैद्यकीय भाषेत या अमिबाला प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (Primary amoebic meningoencephalitis) म्हणतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे केरळमध्ये गेल्या दोन महिन्यांत अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसमुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

तीन प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य सरकारही सतर्क झाले आहे. यापूर्वी 21 मे रोजी मलप्पुरममधील 5 वर्षांच्या मुलीचा आणि 25 जून रोजी कन्नूर येथील 13 वर्षांच्या मुलीचा या धोकादायक अमिबामुळे मृत्यू झाला होता.  केरळच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांना ‘अमीबिक  मेनिंगोएन्सेफलायटीस’बाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा :  ७०० थकबाकीदारांच्या शेतजमिनी जिल्हा बँकेच्या नावावर होण्याची शक्यता

‘ब्रेन इटिंग अमिबा’ किती धोकादायक?

Naegleria fowleri नावाचा हा अमिबा माती, तलाव आणि पाण्याचे स्त्रोत यांसारख्या  ठिकाणी आढळतो. ही फ्री लिविंगऑग्निज्म आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा अमिबा शरीरात गेल्यानंतर शरीराची सेंट्रल नर्वस सिस्टीम अर्धांगवायू होते.

संसर्गाची लक्षणे

Naegleria fowleri amoeba शरीरात गेल्यानंतर एक ते 12 दिवसात या संसर्गाची लक्षणे दिसू लागतात. PAM ची लक्षणे काही प्रमाणात बॅक्टेरियल इन्फेक्शन मेनिंजायटीससारखी असतात. त्याची लक्षणे, जी किरकोळ डोकेदुखीपासून सुरू होतात, ती नंतर तीव्र आणि प्राणघातक बनतात.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)



Source link