Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज


Central Bank Job: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल तर बॅंकेत नोकरी कशी मिळणार असे अनेकांना वाटत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरतीसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल जाणून घेऊया.  

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबईत असून देशभरात अनेक शाखा आहेत त्या शाखांमध्ये ही भरती होत आहे. येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या 484 रिक्त जागा भरल्या जातील. सेंट्रल बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर 21 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरील पीडीएफमध्ये तुम्हाला नोकरीचा तपशील पाहता येईल. 

सफाई कर्मचारी पदासाठी परीक्षा प्राधिकरणाने पात्रता निकष आणि वयोमर्यादा जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून आठवी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण असेल तरी कोणत्याही प्रकारची सवलत नसेल. आठवी उत्तीर्ण ही पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे.

हेही वाचा :  तुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग 'हि' ट्रिक वापरून पाहा

वयोमर्यादा

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.  राखीव प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

कशी असेल सफाई कर्मचारी निवड प्रक्रिया?

या पदासाठी उमेदवारांची निवड आयबीपीएस भरतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची ऑनलाइन स्थानिक भाषा चाचणी होईल. 
यानंतर गुणवत्तेच्या आधारावर ही भरती केली जाईल.  उमेदवारांची निवड करताना आरक्षण धोरण आणि भारत सरकारने या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला जाईल, याची नोंद घ्या.

अर्ज शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांकडून 850 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. तर SC/ST/PwBD/EXSM प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सवलत देण्यात आली असून 175 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.

अर्जाची शेवटची तारीख 

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करणाऱ्या  उमेदवारांना 27 जून किंवा त्यापूर्वी अर्ज करावा लागणार आहे. अधिकृत वेबसाइट – Centralbankofindia.co.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय. 
सफाई कर्मचारी या पदासाठी अर्ज करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक सूचना काळजीपूर्वक वाचावे. 

हेही वाचा :  Corona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी



Source link