6.5 कोटींहून मासिक पगार घेतो भारतात काम करणारा ‘हा’ परदेशी इसम; काय काम करतो पाहा

6.5 कोटींहून मासिक पगार घेतो भारतात काम करणारा ‘हा’ परदेशी इसम; काय काम करतो पाहा


Highest Paid Salary In India: भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा देश आहे. भारतीय वंशाचे अनेकजण जगभरातील आघाडीच्या आयटी कंपन्याचं नेतृत्व करत आहेत. मात्र परदेशातील कंपन्यांमध्ये भारतीय लोक CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना दुसरीकडे विप्रोचे सीईओ थेअरी डेलापोर्टे हे भारतामधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या अहवालामध्ये हे नमूद केलं आहे.

व्यवस्थापकीय निर्देशक पदीही तेच

एकीकडे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यासारखे अनेक भारतीय वंशाचे लोक जगप्रसिद्ध कंपन्यांचं नेतृत्व करत असतानाच थेअरी डेलापोर्टे यांनी भारतातील अनेक आयटी कंपन्यांमध्ये काम केलं आहे. मात्र त्यांच्या पगाराचा आकडा हा सध्या एचसीएल टेक्नोलॉजी किंवा टीसीएसमधील अधिकाऱ्यांपैकी कैकपटीने अधिक आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, थेअरी डेलापोर्टे हे दरवर्षी 82 कोटींहून अधिक रक्कम वेतन म्हणून घेतात. थेअरी डेलापोर्टे हे विप्रोचे व्यवस्थापकीय निर्देशकही आहेत. या कंपनीचं बाजार मूल्य 93,400 कोटी रुपये इतकं आहे.

हेही वाचा :  गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! Wipro च्या इक्विटी शेअर बायबॅकवर सर्वांच्या नजरा, काय असतील निकाल?

28 वर्षांचा अनुभव

विप्रोअंतर्गत सहा वेगवेगळ्या खंडांमध्ये एकूण अडीच लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. थेअरी डेलापोर्टे यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 28 वर्षांचा अनुभव आहे. व्यापार वृद्धी, पार्टनरशीप आणि क्रॉस कल्चरल टीम्स मॅनेज करण्यात थेअरी डेलापोर्टेचा हातखंड आहे. विप्रोच्या आधी थेअरी डेलापोर्टे यांनी कॅपजेमीनीमध्ये सीईओ पदाबरोबरच एक्झिक्युटीव्ह बोर्डमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. कंपनीच्या भरभराटीमध्ये थेअरी डेलापोर्टे यांनी घेतलेल्या निर्णयांचा मोठा वाटा होता.

तरुणांसाठी प्रयत्न

थेअरी डेलापोर्टे हे लाइफ प्रोजेक्ट ऑर युथ नावाच्या बिगरनफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. आर्थिक चणचणीशी दोन हात करणाऱ्या तरुणांना सर्वप्रकारचा पाठींबा देण्याचं काम ही संस्था करते.

सर्वाधिक पगार घेणारे सीईओ

सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीमध्ये दुसरं नाव हे इन्फोसिसचे सीईओ सालील पारेख यांचा क्रमांक लागतो. सालील यांचं वार्षिक पॅकेज 56.45 कोटी इतकी आहे. टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांना वर्षाला पगार म्हणून 30 कोटी रुपये मिळतात. तर टीसीएसचे सीईओ राकेश गोपीनाथन यांनी 2023 मध्ये 29 कोटी रुपये कमावले आहेत.

स्टार्टअपमधील सर्वाधिक कमाई करणारे सीईओ

झिरोदाचे संस्थापक निचीन कामत आणि निखिल कामत हे स्टार्टअपमधील सर्वाधिक कमाई करणारे सीईओ ठरले आहेत. या दोघांनी 72 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. मात्र जे काही ऑन पेपर दिसतंय त्याहून आमची टेक-होम सॅलरी फारच कमी आहे, असं कामत यांनी स्पष्ट केलं होतं. 

हेही वाचा :  WhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...



Source link