कोरोनानंतर आता अजून एक हानिकारक रोगाची एंट्री, दक्षिण कोरियात ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ची पहिली केस

कोरोनानंतर आता अजून एक हानिकारक रोगाची एंट्री, दक्षिण कोरियात ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ची पहिली केस


दक्षिण कोरियामधील नेगलेरिया फाऊलेरी अर्थात ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ च्या संक्रमणाची पहिली केस समोर आली आहे. कोरिया रोग नियंत्रण आणि काळजीवाहू एजन्सी (केडीसीए) ने याबाबत पुष्टी दिली असून एका कोरियाई नागरिकाचा थायलंडवरून आल्यानंतर मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. ही व्यक्ती नेगलेरिया फाऊलेरी या रोगाने संक्रमित झाली होती असेही सांगण्यात आले आहे. पण ब्रेन ईटिंग अमीबा म्हणजे नेमके काय आहे? हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही आणि आता या नव्या आजाराचा सामाना करण्यासाठीही सर्वांना सज्ज राहायला हवे असंच सध्या चित्र आहे. दक्षिणपूर्व आशियाई देशात चार महिने राहिल्यानंतर ५० वर्षीय हा नागरिक आपल्या देशात परत आला आणि दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचे या आजाराने निधन झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

काय आहे Brain Eating Amoeba?

-brain-eating-amoeba

दक्षिण कोरियातील ही पहिली केस आहे. मात्र १९३७ मध्ये अमेरिकामध्ये या आजाराचा पहिला रूग्ण आढळला होता. नेगलेरिया फाऊलेरी हा असा अमीबा आहे, जो जगभरात गरम आणि गोड्या पाण्याच्या सरोवर, नदी आणि तलावात आढळतो. नाकाच्या माध्यमातून श्वासामार्फत हा अमीबा आत जातो आणि मग मेंदूमध्ये आपले वास्तव्य करतो. केडीसीएच्या म्हणण्यानुसार, हा आजार पसरत नाही. पण तरीही या भागातील लोकांना सदर ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अमेरिका, भारत आणि थायलंडसह २०१८ पर्यंत साधारणतः ३८१ रूग्ण आढळले असून यावर योग्य तो उपचार शोधण्याची गरज आहे.

हेही वाचा :  ना वीज, ना डीझेल, ना मेणबत्ती... प्रचंड महागाईने लोकं हैराण... पोट भरण्यासाठी भारताकडे धाव

९७ टक्के लोकांची होतो मृत्यू

माणसाचा मेंदू नष्ट करून हा जीव अमीबा पसरत असल्याचे एका रिपोर्टनुसार आता समोर आले आहे. या संक्रमित जीवाणूमुळे ९७ टक्के व्यक्तींचा या रोगाचे संक्रमण झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. या अमिबाचा जेव्हा माणसाच्या मेंदूवर परिणाम होतो तेव्हा अत्यंत धोकादायक असून ब्रेन डॅमेज होऊ शकते. या अमीबामुळे ब्रेन डॅमेज होणे हा अत्यंत टोकाचा धोका संभवतो. एका रिपोर्टनुसार, तलावाच्या पाण्यात आंघोळ करताना हा जीवाणू एका १९ वर्षीय युवकाच्या डोक्यात शिरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विशेषतः हा जीवाणू गोड्या पाण्याच्या तलावामध्ये आढळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तलाव, नदी आणि अन्य ठिकाणी पाण्यात जाताना काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

(वाचा – कोरोनाचे सावट असताना नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा, पण विशेष काळजी घेणे गरजेचे)

ब्रेन ईटिंग अमीबाची काय आहे लक्षणे

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या प्रोफेसर जिमी व्हिटवर्थने सांगितल्यानुसार, नाकाच्या वाटे हा धोकादायक अमीबा शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेल्यानंतर ब्रेन सेलला नुकसान पोहचवतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पुढील लक्षणे दिसून येतात –

  • डोकं दुखणे
  • ताप येणे
  • चक्कर येणे
  • अचानक फिट्स येणे
हेही वाचा :  मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

वातावरणातील बदलामुळे हा आजार अधिक बळावत असल्याचे दिसून येत आहे. ३० डिग्री सेल्सियस गरम पाण्यात हा अमिबा आढळतो. हा अमीबा अत्यंत धोकादायक असून ब्रेन सेल्स खाण्याचे काम करतो. यामुळे माणसाच्या मेंदूवर संक्रमण होते आणि माणसाचा मृत्यू होतो. Naegleria Fowleri अमीबा इतका सूक्ष्म असतो की, सूक्ष्मदर्शीशिवाय हा दिसू शकत नाही. तसंच हा सूक्ष्म जीव माणसाच्या मृत्यूला त्वरीत कारणीभूत ठरू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link