कौशल कुटुंबाची सून कतरिना कैफच्या साडीत दिलखेच अदा, सौंदर्य पाहून हृदयाचा ठोकाच चुकेल

कौशल कुटुंबाची सून कतरिना कैफच्या साडीत दिलखेच अदा, सौंदर्य पाहून हृदयाचा ठोकाच चुकेल


बॉलिवूडची क्युट अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ.सध्या सोशल मीडियावर एकच नाव आहे ते म्हणजे कतरिना कैफने. नुकतेच तिने एका लग्नाच्या फंक्शनसाठी साडी नेसली होती. या फोटोत तिला पाहून तुम्ही हैराणच व्हाल. सध्या लग्नाचा सीझन सुरू होत आहे आणि तुम्हीही या प्रकारची पेस्टल शेडची साडी खरेदी करु शकता.या साडीमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम @katrinakaif)

​लग्नाच्या फंक्शनमध्ये ही साडी परिधान करु शकता

यावेळी अभिनेत्री कतरिना कैफने पेस्टल शेडची साडी नेसली होती. या साडीवर सुंदर बारीक नक्षी देखील करण्यात आली होती. या साडीत कतरिना कहर करताना दिसत आहे. (वाचा :- बनारसी साडी, लिपस्टिक लावून 24 वर्षांच्या अँड्रिलाला जड अंतःकरणाने निरोप, पायाचे चुंबन घेताना बॉयफ्रेंडला अश्रू अनावर)

​या डिझायनरच्या कलेक्शनमधून निवडली साडी

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवरून तुम्ही तुमच्या मित्राच्या लग्नासाठी किंवा रिसेप्शन पार्टीसाठी टिप्स घेऊ शकता. कतरिनाने ही साडी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून निवडली आहे. (वाचा :- G20 Summit: पंतप्रधान मोदींचा स्वदेशी कपड्यांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट पाहा फोटो)

हेही वाचा :  Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

सिक्वीन्सची डिझाईन

कतरिनाने जोधपूरमध्ये एका लग्नासाठी ही साडी नेसली होती, ही साडी पेस्टल ब्लू कलरची होती आणि त्यावर सिक्विन वर्क होते. यासाडीत ती खूपच सुंदर दिसत होती. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​स्टायलिश ब्लाउजने वाढवली शान

यावेळी कतरिनाने खूपच स्टायलिश ब्लाउज घातला होता, ज्याला प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती, ज्यामध्ये तिचा क्लीवेज भाग देखील दिसत होता. त्याच प्रमाणे या ब्लाऊजच्या पट्ट्यांवर काचेचे कापलेले मणी जोडण्यात आले होते. (वाचा :- ब्रेकअप झाल्यावर प्रिन्सेस डायनाने परिधान केला डीपनेक बोल्ड ब्लॅक ड्रेस, आज ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हणून प्रसिद्ध)

​दागिने आणि मेकअप

या लूकमध्ये कतरिनाने नेहमीप्रमाणे मिनिमम ज्वेलरी कॅरी केली होती. यावेळी, हलक्या मेकअपसह, तिचे केस कर्लमध्ये मोकळे सोडले होते. तिच्या या लूक पाहून तुम्ही देखील. (वाचा :- बिल गेट्सची मुलगी होणार आई, ब्लॅक रंगाच्या लूज ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवत शेअर केले फोटो)

Source link