आईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू

आईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू


Israel- Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चालली आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो लोक जखमी झाले आहेत. Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे.  1 महिन्याचे बाळ आईच्या मृतदेचे दूध पिताना सापडले आहे. दगडाचाही उर भरुन येईल असे हे दृष्य आहे. 

या युद्धात 1,900 पॅलेस्टिनी ठार झाले असून 7हजार 696 जण जखमी झाल्याची माहिती हमासच्या मंत्रालयाने दिली आहे. तर 1,500 पॅलेस्टिनी दहशतवादी मारल्याचा दावा इस्त्रायने केला आहे.

मातीचा ढिगारा हटवताना दिसले बाळ

जवळपास 20 लाख इतकी लोकसंख्या असलेल्या गाझाला स्मशानभूमिचे रुप आले. सर्वत्र मृतदेहांचा ढिगारा आणि जीव वाचवण्यासाठी धडपडणारे लोक असे दृष्य येथे पहायला मिळत आहे. ढिगारा हटवताना सैन्याला मन हेलावून टाकणारे दृष्य दिसले. एक महिन्याचे बाळ मृत आईचे दूध पिताना आढळून आले. हल्ल्यात इमारत जीमनदोस्त झाली. यात या बाळाच्या आईचा मृत्यू झाला. बाळ मात्र, आश्चकारकरित्या बचावले आहे. दुर्घटना घडली तेव्हा बाळ आईचे दूध पित होते.  यामुळे आईच्या मृतदेहाशेजारीच हे बाळ आईचे दूध पिताना सापडले आहे. 

हेही वाचा :  ''सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर'' 'जत वादावर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

हमासच्या क्रुरतेचा कळस 

क्रुरकर्मा हमासच्या अमानविय कृत्यानं कळस गाठलाय. हमासच्या दहशतवाद्यांनी एका चिमुकल्याला गोळ्या घालून ठार केलंय. एवढचं नाही तर या दहशतवाद्यांनी मुलाचा मृतदेह जाळून टाकलाय. इस्रायलच्या PMOनं हा फोटो जारी करत हमासच्या क्रुरतेचं दर्शन घडवून आणलंय. 

महिलेवर अत्याचार

इस्त्रायलमध्ये हमासने केलेल्या क्रुरकृत्यांचा व्हिडिओ समोर आलाय. हमासने एका जर्मन महिलेचं अपहरण केलं. या जर्मन महिलेला मारहाण करण्यात आली. तसंच कपडेही फाडल्याचा दावा इस्त्रायल मीडियाने केलाय. महिलेसोबत गैरवर्तवणूक केल्यानंतर तीला जबरदस्ती गाडीत बसवण्यात आलं.

इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसलं

इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसलंय. ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायली लष्कराने गाझामध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे हवाई हल्लेसुद्धा सुरु आहेत. उत्तर गाझा पट्टीमध्ये घुसून इस्रायली सैन्याने हमासचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. हमासने अँटी टँक मिसाईलने इस्रायली सैन्यावर हल्ला केला. त्याची थरारक दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये चित्रित झाली आहेत. मात्र, इस्रायली हवाई दलाने पलटवार करत हमासचे अड्डे बेचिराख करुन टाकले.. उत्तर गाझा पट्टी सोडा असा अल्टिमेटम इस्रायलने कालच दिला होता. त्यासंदर्भातही पत्रकही विमानांमधून गाझा पट्टीत फेकण्यात आली होती.

हेही वाचा :  'अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,' हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप



Source link