पाणी संकट दूर होणार; वैतरणा, भातसा, बारवी, खडकवासलासह प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

पाणी संकट दूर होणार; वैतरणा, भातसा, बारवी, खडकवासलासह प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ


Heavy Rain In Maharashtra : मुंबईकरांवरचं पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भातसा धरण क्षेत्रात 237 मिलिमीटर, तानसा धरण क्षेत्रात 120 मीमी, विहार धरण क्षेत्रात 26 मिमी, तुळशी धरण क्षेत्रात 32 मिमी, तर मध्य वैतरणा धरण क्षेत्रात 48 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात सरासरी दीड मीटरने वाढ 

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बदलापूर जवळील बारवी धरणात गेल्या 24 तासात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बारवी धरणात जोरदार पाऊस झाला आहे.  बारवी धरणातून ,ठाणे ,कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, मीरा-भाईंदर तसेच एमआयडीसी क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो , गेली 24 तासात बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात सरासरी दीड मीटरने वाढ झाली आहे. 

खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ

खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात 5.87 टीएमसी पाणीसाठा वाढलाय. टेमघर ,वरसगाव,पानशेत या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जारदार पाऊस पडतोय. चारही धरणात मिळून पुणे शहराला एक महिना पुरेल इतका पाणीसाठा झालाय. 

हेही वाचा :  Goa मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस? या भाजप आमदाराने राज्यपालांची भेट घेतल्याने खळबळ

सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून दमदार पाऊस पडतोय.. 24 तासात चांदोली धरण परिसरात 79 मिमी पावसाची नोंद झालीय. धरण 46.8% टक्के भरलंय… पावसामुळे बळीराजा सुखावला असून परिसरात चिक्कलगुट्टा भात रोप लागणीला सुरुवात झालीय.

 



Source link