Pune News : पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर

Pune News : पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर


Pune News Zika Virus And Dengue Patients Increased : पुणेकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतो आहे. पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या पाहिली तर ती 23 वर गेली आहे. तर राज्यात 25 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येक एक एक रुग्ण आढळल्यामुळे झिकाचं सावट दिसून येत आहे. झिका व्हायरसचा धोका महिला, पुरुष आणि तरुणांचा रुग्णांना असून लहान मुलांना धोका नाही. (Pune News Dengue and Zika virus patients rises Shocking statistics in front) 

तर गर्भवती स्त्रियांना धोका कायम असून बाळाचा मेंदू लहान होण्याची शक्यता आमि मुदतपूर्व प्रसूतीचीदेखील शक्यता निर्माण झाल आहे. 

झिकापासून बचाव कसा कराल ?

घरात डास होऊ देऊ नका.
घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.
मच्छरदाणीचा वापर करा.
घरामध्ये साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये.
घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगा

शहरावर डेंग्यूचं सावट !

झिका पाठापोठात आता पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील वाढ होताना दिसून येत आहे. महिन्याभरात डेंग्यूचे एकूण 216 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील एकाच आठवड्यातील तब्बल 156 रुग्णांची भर पडली आहे. पावसाळ्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी स्वच्छता बाळगण्याचं आणि डासांपासून बचाव करण्याचं उपायांवर भर द्यावा, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय. 

हेही वाचा :  Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

दरम्यान डेंग्यू रुग्णांची आकडेवारी पाहिली तर जानेवारी 96, फेब्रुवारी 75 , मार्च 64 , एप्रिल 51 आणि मे 44 रुग्णांची नोंद झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. शहरात वर्षभरात डेंग्यूचे 703 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.



Source link