OLA ची बाईक Roadster X अखेर बाजारात दाखल, लूक पाहून व्हाल फिदा; किंमतही खिशाला परवडणारी

OLA ची बाईक Roadster X अखेर बाजारात दाखल, लूक पाहून व्हाल फिदा; किंमतही खिशाला परवडणारी


Ola Roadster Bike: ओला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric) बाईकची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागली होती. ही बाईक नेमकी कशी असेल, तिची किंमत यासह लूक कसा असेल? याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. अखेर ओला इलेक्र्टिने आपली रोडस्टर रेंज बाईक बाजारात लाँच केली आहे. 15 ऑगस्टला ही बाईक अखेर लाँच करण्यात आली आहे. ओलाची रोडस्टर तीन वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. ओला रोडस्टर सीरिजमध्ये Roadster, Roadster X आणि Roadster Pro असे तीन वेगवेगळे मॉडेल्स आहे.  ओलाची ही इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे. 

Ola Roadster X स्पोर्टी लूकमध्ये उपलब्ध आहे. तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅक साईजमध्ये ही बाईक उपलब्ध आहे. Ola Roadster X च्या फिचर्सबद्दल जाणून घ्या. 

Ola Roadster X

रोडस्टर एक्स हे एंट्री-लेव्हल व्हेरिएंट आहे, जे तीन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आहे. Ola Roadster X ची किंमत 75 हजारांपासून सुरू होते. या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स, समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक, एलसीडी डॅश, ओला मॅप्स, क्रूझ कंट्रोल आणि इतरही फिचर्स आहेत.

हेही वाचा :  पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्...; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

ओलाने दावा केला आहे की, रोडस्टर एक्स व्हेरियंट 2.8 सेकंदात ताशी 0 ते 60 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक 200 किमीचा टप्पा गाठू शकते. तसंच ताशी 124 किमीचा टॉप स्पीड आहे. 

Ola Roadster

ओला रेंजमधील पुढील मोटरसायकल मिड-स्पेक रोडस्टर आहे, जिची एक्स-शोरूम किंमत 1.04 लाख रुपये आहे. एंट्री-लेव्हल X प्माणे, रोडस्टरदेखील तीन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये टॉप-ट्रिम 126 किमी प्रतितास वेगाने पोहोचण्यास आणि 248 किमीच्या रेंजमध्ये  परत करण्यास सक्षम आहे.

रोडस्टरला X प्रमाणेच सस्पेन्शन सेटअप मिळतो. पण सिंगल चॅनेल ABS सह ड्युअल डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसंच टचस्क्रीन TFT डॅश, क्रूझ कंट्रोल, पार्टी मोड, AI असिस्ट, रोड ट्रिप प्लॅनर आणि बरंच काही आहे. 

Ola Roadster Pro

टॉप व्ह्रेरियंट Roadster Pro दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आहे. हिची किंमत 1.99 लाखांपासून सुरु होते. रोडस्टर प्रो 1.2 सेकंदात 0 ते 60 किमीचा वेग पकडू शकते. तसंच ताशी194 किमीचा टॉप स्पीड आहे. 

Ola Roadster Pro मध्ये USD फोर्क्स, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक, स्प्लिट सीट सेटअप, ADAS, थ्री-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, इंटिग्रेटेड राइड मोड्स आणि बरेच काही मिळते.

हेही वाचा :  दिग्गज कंपन्या फक्त पाहत राहिल्या! 'या' कंपनीच्या Electric Scootersची धडाक्यात विक्री; 40 टक्के मार्केट घेतलं ताब्यात



Source link