पोलीस कोठडीमध्येही मनोरमा खेडकरांचे नखरे सुरुच! हवीयेत चॉकलेट अन् फळं

पोलीस कोठडीमध्येही मनोरमा खेडकरांचे नखरे सुरुच! हवीयेत चॉकलेट अन् फळं


Manorama Khedkar News: शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणात मनोरमा खेडकर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, मनोरमा खेडकऱ्यांच्या पोलीस कोठडीतील मिजासीचे किस्से बाहेर आले आहेत. सर्वसामान्य कैद्यांना दिले जाणारे जेवण मला नको, अशी तक्रारच त्यांनी केली आहे. पोलीस कोठडीतही खेडकरांचा ताठा कायम असल्याची चर्चा आहे. 

मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवरही एकामागून एक आरोप केले आहेत. कोठडीत जेवण मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य कैद्यांना दिले जात असलेले जेवन मला नको. मला फळे आणि चॉकलेट खाण्यासाठी द्या, अशी मागणी मनोरमा खेडकर या करत होत्या. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कैद्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात भात, वरण आणि भाजी पोळी असाच आहार त्यांना दिला जात होता. मात्र, मनोरमा खेडकर या पोलिसांकडे चॉकलेट आणि फळांची मागणी करत होत्या. तसंच, पिण्यासाठी गरम पाणी द्या, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळून लावली व त्यांना सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच जेवण दिले. 

मनोरमा खेडकरांचा जामीन अर्ज फेटाळला 

मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मनोरमा खेडकर यांना पुणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.न्यायालयीन कोठडी मिळतच मनोरमा खेडकर कडून न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र हाच जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मनोरमा खेडकर यांचा मुक्काम आणखीन काही दिवस येरवडा जेलमध्येच वाढणार आहे. 

हेही वाचा :  कर्जाच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त 'हे' काम करून वसूल करा एक एक रुपया

मनोरमा खेडकरांच्या घटस्फोटाची चौकशी होणार 

पुजा खेडकर यांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यामध्ये खरंच घटस्फोट झाला होता की त्यांनी घटस्फोटाचा बनाव केला होता याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत.



Source link