Kolhapur Panchganga River Water Level Rising : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार अजूनही कायम आहे. त्यामूळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फूट 3 इच इतकी झाली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पावसामुळे पंचगंगेच्या वाढणाऱ्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच बरोबर नदी काठच्या लोकांचे स्थलांतर केले जात आहे. जिल्हयातील अनेक रस्त्यांवर पाणी आले असून कोल्हापूर – रत्नागिरी मार्ग देखील वाहतूक बंद करण्यात आली होती.
कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरूये..त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी पात्र सोडलंय….हे पाणी आता रस्त्यावर येवू लागलंय… वाहन चालक या पाण्यातून वाट काढत पुढे जातायत…
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळतोय…त्यामुळे चांदोली धरण 82 टक्के भरलंय…धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणातून 3 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणारेय.. पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होतोय. भोर, वेल्हा, मुळशी भागात 200 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झालीय.
मुळशी आणि धावडी भागात 229 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. तर कुरुंजी भागात अति मुसळधार पावसाचे नोंद झालीय.
कृष्णा नदीचे पाणी देण्याची मागणी
कृष्णेच वाहून जाणारे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ संचालक यांच्याकडे केली आहे. दक्षिण भागातील या गावांना अद्यापही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टेल टू हेड नियमाने कृष्णेचे पाणी आले तर पाझर तलाव, बंधारे, साठवण तलाव भरले तर भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.