BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: गोल्डस्टार की इंटरसेप्टर? कोणती बाईक खरेदी करणं ठरेल उत्तम डील?

BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: गोल्डस्टार की इंटरसेप्टर? कोणती बाईक खरेदी करणं ठरेल उत्तम डील?


BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: भारतीय रस्त्यांच्या अनुषंगानं रॉयल एनफिल्ड या कंपनीकडून कायमच ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेत त्याच अनुषंगानं बाईक सादर करण्यात आल्या. याच ब्रँडला टक्कर देण्यासाठी सध्या एक बाईक बाजारात आली असून, भारतीय Auto क्षेत्रामध्ये याच बाईकची जोरदार चर्चा सुरू आहे. ब्रिटीश ऑटोमेकर BSA च्या या बाईकचं नाव आहे गोल्ड स्टार 650. 

यंदाच्याच वर्षी 15 ऑगस्टमध्ये ही बाईक लाँच करण्यात आली. 2021 पासून बाईक प्रेमींसाठी कमाल पर्याय ठरणारी ही बाईक आता भारतात आल्यामुळं क्रूझर बाईकप्रेमींसाठी एक कमाल पर्यायही तयार झाला आहे. असं असतानाच रॉयल एनफिल्ड हा ब्रँड मात्र आता काही आव्हानांचा सामना करताना दिसणार आहे. कारण, गोल्ड स्टार 650 ही बाईक एनफिल्डच्या इंटरसेप्टरला टक्कर देताना दिसेल असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

नव्यानं लाँच झालेल्या गोल्ड स्टार 650 ची सुरुवाती किंमत 2.99 लाख रुपये इतकी असून, या बाईकचं टॉप एंड मॉडेल 3.35 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तर, एनफिल्डच्या इंटरसेप्टर या बाईकचं बेस मॉडेल 3 लाथ 3 हजार रुपये इतकं आहे. या बाईकच्या टॉप मॉडेलची किंमत 3.31 लाख रुपये इतकी आहे. 

हेही वाचा :  तुमच्याकडे जुन्या नोटा-नाणी असतील तर तुम्हीही होऊ शकता रातोरात श्रीमंत, पाहा डिटेल्स

बाईकची तुलना फिचरच्या धर्तीवर… 

इंटरसेप्टर आणि गोल्ड स्टार या दोन्ही बाईकचं डिझाईन क्लासिक लूकमध्ये असून या दोन्ही बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत. तर, बाईकच्या चाकांवर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये असणारं इंजिनसुद्धा तितकंच दमदार असून, बाईकप्रेमींसाठी इथंच सारी गणितं येऊन थांबत आहेत. 

एनफिल्डच्या इंटरसेप्टरमध्ये 648 cc, पॅरेलल ट्विन, 4 स्ट्रोक, सिंगल ओवरहेड कॅम, एअर ऑईल कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. या बाईकमध्ये देण्यात आलेल्या इंजिनमधून 7,150 rpm वर 47 bhp इतकी पॉवर जनरेट होते. तर, 5,250 rpm वर 52 Nm इतका टॉर्क जनरेट होतो. 

बीएसए गोल्ड स्टार 650 या बाईकमध्ये  652 cc, लिक्विड-कूल्ड, DOHC, 4-वॉल्व इंजिन देण्यात आलं आहे.  ज्यामुळं बाईकमध्ये 6,000 rpm च्या प्रमाणं 45hp पॉवर जनरेट होते. आणि 4,000 rpm वर 55 Nm टॉर्क जनरेट होतो. 

गोल्ड स्टार बाईकमध्ये 12 लीटरचा फ्लूल टँक देण्यात आला असून, इंटरसेप्टरमध्ये 13.7 लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. ज्यामुळं या बाईकला अनेकांचीच पसंती मिळताना दिसत आहे. किंमत आणि फिचरच्या एनफिल्डची इंटरसेप्टर ही बाईक उजवी ठरताना दिसत असून, गोल्ड स्टारलाही काही बाईकप्रेमी पसंती देताना दिसतील असं अनेकांचा प्राधान्यक्रम आणि गरजा पाहता लक्षात येत आहे. 

हेही वाचा :  ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?



Source link