Tata Curvv EV Launch: 585KM रेंज आणि 15 मिनिटात फूल चार्ज; टाटाने लाँच केली कुपे-स्टाईल SUV; किंमत फक्त….

Tata Curvv EV Launch: 585KM रेंज आणि 15 मिनिटात फूल चार्ज; टाटाने लाँच केली कुपे-स्टाईल SUV; किंमत फक्त….


Tata Curvv EV Launch- Price and Features: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने अखेरीस आपली बहुप्रतिक्षित कुपे-स्टाईल इलेक्ट्रिक एसयुव्ही Tata Curvv EV ला अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार पॉवरट्रेनने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक एसयुव्हीची किंमत 17 लाख 49 हजार (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. 

पॉवर आणि परफॉर्मन्स

Tata Curvv EV ला कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केलं आहे. यामध्ये 55kWh आणि 45kWh च्या दोन बॅटरी पॅकचे पर्याय देण्यात आला आहे. कंपनी यासह फास्ट चार्जिंगचा पर्यायही देत आहे. कंपनीचा दावा आहे की, 1.2C चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीनेया कारला फक्त 15 मिनिटांमध्ये चार्ज केलं जाऊ शकतं. ही कार 150 किमीची रेंज देते. याच्या बॅटरीला 70kW च्या चार्जरने फक्त 40 मिनिटात 10 पासून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केलं जाऊ शकतं. फुल चार्ज झाल्यानंतर ही कार 585 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. 

Curvv EV अॅडव्हान्स फिचर्सने सुसज्ज असल्याचं टाटा मोटर्सचं म्हणणं आहे. यामध्ये कंपनीने 123kW क्षमतेची लिक्विड कूल पर्मनंट मॅग्नेट पॉवरफूर इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे. ही एसयुव्ही फक्त 8.6 सेकंदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यास सक्षम आहे असा कंपनीचा दावा आहे. 

हेही वाचा :  Ferrari 296 GTS: फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 चा जबरदस्त स्पीड! भारतात लाँच झाली पॉवरफुल कार

कारने कार होणार चार्ज

कंपनीने नेक्सॉनच्या धर्तीवर टाटा कर्वला काही उपयुक्त वैशिष्ट्यांसह सुसज्ज केलं आहे. व्हीकल टू व्हीकल (V2V) आणि व्हीकल टू लोड (V2L) फंक्शन देखील यामध्ये दिलेले आहे. V2V प्रणालीच्या मदतीने तुम्ही एका इलेक्ट्रिक कारच्या मदतीने दुसरी इलेक्ट्रिक कार देखील चार्ज करू शकता. V2L च्या मदतीने तुम्ही तुमच्या कारमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणं चालू करू शकता. ही कार Arcade.ev तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. याशिवाय, कंपनीने Tata EV Originals देखील लॉन्च केले आहे ज्याद्वारे ग्राहक कंपनीच्या अधिकृत ॲक्सेसरीज खरेदी करू शकतात.

फिचर्स काय आहेत?

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या कारचे केबिन प्रीमियम बनवण्यासाठी विशेष काम करण्यात आले आहे. यात 6-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, प्रीमियम लेदरेट व्हेंटिलेटेड सीट, रिक्लाइन फंक्शनसह दुसरी रो सीट, कस्टमायझेशन सिस्टमसह केबिन मूड लाइटिंग, मल्टी-डायल-व्ह्यूसह 26 सेमी डिजिटल कॉकपिट आहे. यात ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग साइट, arcade.ev ची सुविधा देखील आहे जी 20 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म आणि ॲप्सना सपोर्ट करतं.

टाटाने कारमध्ये 9 JBL स्पीकर समाविष्ट केले आहेत. याशिवाय ही एसयूव्ही मल्टिपल व्हॉईस कमांड सिस्टमने सुसज्ज आहे  जे भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये कमांड घेते. ज्यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु आणि बंगाली यांचा समावेश आहे. Curve Advance मध्ये उत्कृष्ट डिजिटल 4-स्पोक स्टीयरिंग व्हील, पॅडल शिफ्टर्स, पॉवर्ड टेलगेट, वायरलेस चार्जर आहे.

हेही वाचा :  Tata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर

सुरक्षेचं काय?

टाटाने आपल्या इतर मॉडेल्सप्रमाणे ही एसयूव्ही देखील सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यात लेव्हल-2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS) प्रणाली देण्यात आली होती. याशिवाय 6 एअरबॅग्ज (मानक म्हणून), 3-पॉइंट ELR सीटबेल्ट, सीट-बेल्ट अँकर प्रीटेन्शनर, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर, स्थिरता नियंत्रण कार्यक्रम (ESP), आपत्कालीन ब्रेकिंग, JBL. सिनेमॅटिक इन्फोटेनमेंट सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष फिचर

इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन नसल्याने या गाड्या आवाज करत नाहीत. त्यामुळे अनेकदा पादचाऱ्यांना इलेक्ट्रिक कार बाजूने जात असलं तरी समजत नाही. अशा स्थितीत त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी टाटा मोटर्सने त्यांच्या Curvv EV मध्ये एक नवीन अकॉस्टिक व्हीकल अलर्ट सिस्टम (AVAS) दिली आहे. जेव्हा कार धीम्या गतीने (20 किमी/तास पेक्षा कमी) धावेल, तेव्हा हा आवाज पादचाऱ्यांना ऐकू येईल. पण गाडीने ताशी 20 किमीचा वेग ओलांडताच हा आवाज बंद होईल.



Source link