राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला; सुचवलं ‘हे’ नाव

राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला; सुचवलं ‘हे’ नाव


Rajya Sabha Elecction 2024 : राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. अशातच आता या निवडणूकीपूर्वी (Rajya Sabha Elecction) राज्याच्या राजकारणात चर्चेला उधान आलंय. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? कोणत्या गटाला किती जागेवर संधी मिळणार? यावर जोरदार राजकीय (Maharastra Politics) कट्ट्यांवर खुसपूस ऐकायला मिळत आहे. अशातच आता राज्यसभा बिनविरोध होणार का? असा सवाल विचारला जातोय. महायुती आणि महाविकास आघाडीने यावर एकमताने निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेसला 1 अशा जागा वाटप झाल्याची माहिती समोर येतीये. अशातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्वपक्षांना एक सल्ला दिलाय.

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यसभा बिनविरोध होणार का? असा सवाल राऊत विचारतात. सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा, असं संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटलं आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून 30 मते वेगळी आहेत आणि इतरही येतील, असं संजय राऊत म्हणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांना टॅग करत संजय राऊतांनी दोन्ही नेत्यांना सल्ला दिलाय.

हेही वाचा :  पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी चिंतेत, वरुणराजा पुन्हा कधी बरसणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात देखील उलटफेर दिसून येतोय. संभाजीराजे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित होतंय. तर दुसरीकडे  छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, असं वक्तव्य शाहू महाराजांनी केलं होतं. त्यामुळे आता शाहू महाराजांना जर राज्यसभेची जागा देयची झाली तर अजित पवार गटाला तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळणं निश्चित असल्याने अजित पवार कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आणखी वाचा – ‘गृहमंत्री राजीनामा द्या, कायद्याच्या चिंधड्या…’, गायकवाड गोळीबार प्रकरणावर रोहित पवारांची सडकून टीका

दरम्यान, भाजपचे खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय. तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे. कोल्हापूर लोकसभा जागांबाबत अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे. 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील दोन्ही जागा गमावल्या आहेत. मात्र आमदारांची संख्या लक्षात घेता काँग्रेस आगामी लोकसभेला या जागेवर दावा करणार का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

हेही वाचा :  Maharastra Politics : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा



Source link