बारावीत शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या तनिशाने सांगितलं यशाचं गुपितं

12th Topper Tanisha Bormanikar: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यात छत्रपती संभाजी नगरची तनिशा बोरमणीकर राज्यातून पहिली आली आहे. तिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत. दरम्यान तनिशाने कसा अभ्यास केला? अभ्यासाला किती तास दिले? याची माहिती झी 24 तास ला तिने दिली आहे. 

बारावीत विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थी,  कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. व्यावसायिक अभ्यासक्रमातील 37,226 आणि आटीआयमधील 4750 विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर झाला. 

संभाजीनगरची तनिशा बोरमणीकर या मुलीला बारावीत शंभर टक्के गुण मिळाले आहेत. पैकीच्या पैकी गुण मिळवणारी तनिशा कॉमर्सची विद्यार्थीनी आहे. बारावीत शंभर टक्के निकाल लागेल असे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. 95 टक्के गुण मिळतील असं वाटल होतं पण शंभर टक्के गुण मिळतील असं वाटलं नव्हत. यामुळे खूप आनंदी असल्याचे तनिशा म्हणाली.  

मी शेवटच्या 2 महिने अभ्यास केला. माझ्या बुद्धीबळ स्पर्धा असायच्या. त्यामुळे पूर्ण वेळ अभ्यास करु शकले नव्हते. पण शेवटचे 2 महिने खूप अभ्यास केल्याचे तनिशाने सांगितले. 

हेही वाचा :  HONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील

बारावीच्या परीक्षेचे मी एवढं टेन्शन घेतलं नव्हतं. माझ्यावर घरच्यांचाही दबाव नव्हता. आज निकालाच्या दिवशी नर्व्हस होती. पण आता खूष असल्याचे तिने सांगितले. 

दहावी, बारावीमध्ये टॉप करण्यासाठी तासनतास अभ्यास करावा लागतो असे म्हणतात. तू  कितीवेळ अभ्यास केलास असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, मी दहा-बारा तास अभ्यास नाही केला, असे तिने सांगितले. 

मागच्या वर्षीचे पेपर सोडवत गेली. मॉक टेस्ट रोज सोडवत गेली. त्यामुळे माझा अभ्यास होत गेला. या दिवशी मला एखाद्या विषयाचा अभ्यास पूर्ण करायचाय. मग कितीही वेळ लागूदे असा टार्गेट मी ठरवला होता, असे ती म्हणाली. 

माझी दहावीची परीक्षा झाली तेव्हा मी बुद्धीबळात राष्ट्रीय चॅम्पियन झाले होते. त्यावेळी सायन्स मला घ्यायचे नव्हते आणि मला सायन्समध्ये आवड देखील नव्हती. 

भविष्यात मला सीए बनायचे आहे. मी फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतेय, असे तिने सांगितले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …